खुनाचे गुन्हयातील सहा वर्षापासुन फरार असलेला अटल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL


नांदेड।
रेकॉर्डवरील पाहीजे / फरारी आरोपीतांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन पाहीजे फरारी आरोपीचा शोध घेणे चालु होते.

दि. 15/12/2022 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे देगलुर वजीराबाद गुरनं. 44/2017 कलम 302,34 भा.द.वि सह 3/25,4/25 शस्त्र अधिनियम, गुरनं. 165/2005 कलम 324,323 भा द वि गुरनं. 78/2008 कलम 425,326 भा द वि गुन्हयातील फरार आरोपी नामे दलजितसिंघ खुंबासिंघ पाठी हा मौजे मालेगाव ता अर्धापुर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने पो. नि. स्था. गु. शा. नांदेड यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांना रवाना केले. स्था. गु. शा. चे पथकाने मौ. मालेगांव ता. अर्धापुर जि. नांदेड येथे जावुन आरोपी नामे वय 55 वर्ष व्यवसाय मजुरी रा. गुरुव्दारा गेट नंबर-5 नांदेड ह. मु. वसमत जि. हिंगोली यास ताब्यात घेतले असुन त्यास पुढील तपासकामी पोलीस ठाणे वजीराबाद यांचे ताब्यात देण्यात आले आहे. 

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / जसवंतसिंघ शाहु , सपोउपनि/ मारोती तेलंग, पोकॉ/ मोतीराम पवार, महेश बडगु, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी