नांदेड| श्री संत साधु महाराज संस्थान गंगाखेड च्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार ह.भ.प. चैतन्य महाराज कंधारकर यांची मे महिन्यात श्रीक्षेत्र शुकताल येथे श्रीमद्भागवत कथा आयोजित करण्यात येत आहे. दिनांक ७ मे रोजी सर्व भाविक भक्त नांदेड येथून मथुरा वृंदावन हरिद्वार ऋषिकेश आदी तीर्थस्थळांचे दर्शन होईल
कथा व नामसंकीर्तन महोत्सव श्रवणासाठी दि.11 ते 17.हा कालावधी राहील तसेच दिनांक 19 मे रोजी भाविकांचा परतीचा प्रवास असेल. त्याचप्रमाणे आयोजन व नियोजनासाठी श्रीबालासाहेब लखेकर प्रभाकर देशमुख शशीकांत पाटील, संजय रुद्रवार, बालासाहेब पांडे संगम गंदेवार बालाजी मेडेवार मनोज अरगुलवार गजानन पाठक राजु जोशी विशाल नारलेवार कमलाकर देशमुख यांच्यासह संस्थानातील अनेक पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत या धार्मिक सोहळ्यात शिवकुमार जोशी सलगरकर श्रीतातु महाराज कंधारकर काकडा प्रमुख दुर्गादास दरेगावकर संहिता वाचक योगेश जोशी पूजा पाठ निलेश देशपांडे (भजन प्रमुख जीवन देशपांडे )
(तबला वादन श्री अमोल लाकडे नांदेड) (माऊली पवार आळंदी सिंथ) यांचेही योगदान लाभणार आहे ज्या भाविक भक्तांना शुकताल येथील भागवत कथेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन श्री संत साधु महाराज संस्थान यात्रा समिती गंगाखेड च्या वतीने करण्यात आले आहे..