धम्माश्रय युवा मंचच्यावतीने रक्तदान शिबिर घेवून महामानवास अभिवादन -NNL


नांदेड|
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त शहरातील प्रभात नगर येथील धम्माश्रय  युवा मंचच्यावतीने श्रीगनगर येथे रक्तदान शिबिराचे अयोजन करुन महामानवास अभिवादन करण्यात आले. 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोनि सुधाकर आढे यांच्याहस्ते संपन्न झाले. तर प्रमुख पाहुणे बालरोगतज्ञ डॉ. संग्राम जोंधळे,विमानतळ पोलीस स्टेशनचे पोनि अनिरुध्द काकडे, जिल्हा जातपडताळणी अधिकारी सोनू दरजगावकर, सामाजिक कार्यकर्त्या भारतीबाई सदावर्ते, प्रभातनगर गृ.नि.स.संस्थेचे चेअरमन शंकर निवडंगे यांची उपस्थिती होती.

महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाभरामध्ये विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील प्रभातनगर येथील धम्माश्रय युवामंच या संघटनेच्यावतीने महामानवास श्रीनगर येथील पंचशील ड्रेसेसच्या बाजुला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्घाटक पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करुन रक्तदानाचे महत्त्व याविषयी उपस्थितांना माहिती सांगीतली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले. 

या रक्तदान शिबिरामध्ये ९४ महिलाा पुरुषांनी रक्तदान करुन महामानवास विनंम्र अभिवादन केले. गेली १५ वर्षापासून धम्माश्रय युवामंच रक्तदान शिबिराचे आयोजन करुन गरजुंना रक्तपुरवठा करण्याचे कार्य करुन आपली सामाजिक भूमिका पार पाडत आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता प्रभातनगर येथुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, युवकांनी वँâडल मार्च काढुन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिरासाठी संदिप वाठोरे, राहुल सुर्यतळे, अविनाश कदम,  सुमेध खंदारे, संदीप जोंधळे, रवी कांबळे, राहुल कांबळे, संकेत खिल्लारे, अमर सोनसळे आदी युवकांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी