शेतकऱ्यांना केले ऊस लागवडीचे आवाहन
हिमायतनगर/उमरखेड। शेतकऱ्यांची कामधेनु अशी ओखळ असलेला पोफाळीचा वसंत साखर कारखाणा मागील पाच वर्षापासून बंद अवस्थेत होता. या दरम्यान कारखाणा परिसरातील मराठवाडा आणि विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले. याची खासदार हेमंत पाटील यांना जाणिव झाल्यानंतर त्यांनी वसंत कारखाणा भाडेतत्वावर घेऊन शेतकऱ्यांना त्यांची कामधेनु परत देण्याचे आवाहान पेलले आहे. पोफाळीचा वसंत साखर कारखाणा लवकरच शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड करावी असे आवाहन वसंत साखर कारखाण्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर व मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेंद्र कटियार शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.
पोफाळीसह यवतमाळ, पुसद, महागाव, उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, माहुर किनवट, कळमनुरी परिसरातील ऊस उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अजय देशमुख म्हणाले की, यंदाच्या हंगामापासून वसंत कारखाणा सुरु होणार आहे. कारखाणा सुरु होण्यास यंदा विलंब झाला असला तरी, वसंत साखर कारखाणा पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. त्यामुळे कारखाणा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व कारखान्यांच्या बरोबरीने ऊसाचे पैसे देण्यात येतील. पुढील हंगामाच्या दृष्टीने नगदी पिक म्हणून बागायतदार शेतकऱ्यांनी पुन्हा जोमाने ऊसाची लागवड केली पाहिजे. असे आवाहन कारखाण्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेंद्र कटियार यांनी केल.
या बैठकीस उपस्थित बागायतदार शेतकऱ्यांनी वसंत कारखाणा पाच वर्षाच्या खंडा नंतर का होईना सुर होत असल्याने शेतकरी वर्गाला बळ मिळाल्याची कबुली देत पुन्हा जोमाने ऊसाची लागवड करण्यास तयारी दर्शविली आहे. एकंदरीत हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील काही तालुके जोडणारा पोफाळीच्या वसंत साखर कारखाणा लवकरच सुरु होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.