नायगांव। नायगाव तालुक्यातील नरसी येथे ग्राम पंचायत तर्फे चालू असलेल्या पांदण रस्त्याच्या कामासाठी मुरूम नेणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नरसी येथील माजी सरपंचाचे प्रतिनिधी गजानन पांडुरंग भिलवंडे यांच्यासह तिघांजना विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिनांक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, नरसी तालुका नायगाव खै. येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू असलेल्या पांदन रस्त्याच्या कामासाठी मुरूम नेत असलेल्या ट्रॅक्टरला येथील माजी सरपंचाचे प्रतिनिधी गजानन पांडुरंग भिलवंडे, मारोती बळीराम भिलवंडे, बाळु उर्फ नारायण पांडुरंग भिलवंडे यांनी ट्रॅक्टर अडवून रॉयल्टी परवानगी आहे का ? असे विचारत तुला वाहतूक करू देणार नाही मनून ट्रॅक्टर पुढे उभे राहीले असता नरसी येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास सुर्यवंशी यांनी वरील तिघांना गावच्या विकास होत असताना तुम्ही अडचण आणू नका म्हणून विनंती करत समजावून सांगण्याचे प्रयत्न केल्याने मांगडग्या तुझी गांड भरली, हरामखोरा असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी देविदास नागोराव सूर्यवंशी वय ४५ वर्ष रा. नरसी यांनी रामतीर्थ पोलीस पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली.
सपोनि संकेत दिघे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठांना कळवले असता धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिनांक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गजानन पांडुरंग भिलवंडे, बाळु उर्फ नारायण पांडुरंग भिलवंडे, मारोती बळीराम भिलवंडे सर्व राहणार नरसी यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गु.र.न. २०० / २०२२ कलम ३४१, ३४३, ५०४, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती सपोनि संकेत दिघे यांनी दिली आहे.