तक्रारीचा निपटारा उपक्रम जिल्ह्यात लागू केल्याबद्दल नागरिकांत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे होतेय अभिनंदन
हिमायतनगर,अनिल मादसवार। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या सूचनेवरून हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्यात मागील दोन आठवड्यापासून दर शनीवारी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 13 प्रकरणे तडजोडीतून मिटवण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बीड भूसणार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
नांदेड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला छोटे-मोठे प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याचे सांगून यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करून तक्रारीचा निपटारा करा अशा प्रकारचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाला अनुसरून नागरिकांच्या वाढत्या तक्रारी जागच्या जागीच मिटाव्या यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण कक्ष सुरू करून तक्रार निवारण दिन साजरा केला जातो आहे. यामध्ये येणाऱ्या तक्रारीच्या निफ्टारा करण्यासाठी वादी प्रतिवादी यांना समोरासमोर उभे करून तडजोडीतून हे प्रकरणे निकाली काढा असे सांगितले होते.
त्यानुसार मागील तीन शनिवारपासून हिमायतनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले असून, यामध्ये पहिल्या शनिवारी तीन तक्रारी निकाली निघाल्या तर दुसऱ्या शनिवारी पाच प्रकरणे तर आजच्या शनिवारी दहा प्रकरणे आली त्यापैकी 5 प्रकरणे तडजोडीतून मिटवण्यात आली असून असे एकूण 13 प्रकरणे आतापर्यंत मिटविल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्याचे नाव जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. मागील 3 आठवड्यात दाखल झालेल्या पैकी अनेकांची प्रकरणे सामंजस्याने मिटल्यामुळे एकमेकांबद्दल गैरसमज दूर करून प्रकरणे निकाली काढण्याचे काम सुरू झाले आहे. दर शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत येणाऱ्या तक्रारी तडजोडीतून सोडविण्यात येत आहेत हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वचं पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असल्याचेही पोलीस निरीक्षक बिडी भुसनर यांनी सांगितले.
यामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या तक्रारी, जमिनीचे वाद, सिविल मॅटर अश्या दोघांमधील तक्रारी वाढून विकोपाला जाऊ नयेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वादी प्रतिवादी या दोघांना एकत्र बसून या दोघांमधील वाद मिटवत सामाजिक तडजोड करून प्रकरणे निकाली काढले जात आहेत. यामुळे तक्रारदार आणि विरोधी गटाचा दोघांचाही खर्च आणि वेळ वाचणार असून, आपसातील भेदभावही दूर होण्यास मदत होणार असल्याचेही या तक्रार निवारण कक्षात निकाली निघालेल्या प्रकरणातून पुढे येऊ लागले आहे. हा उपक्रम जिल्ह्यात लागू केल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांनी सुरू केलेल्या तक्रार निवारण दिनामध्ये आपल्या छोट्या मोठ्या तक्रारी तडजोडीसाठी ठेवून एकमेकांनी समजूतीने वाद मिटवून घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक बी डी भुसनर यांनी पत्रकारांच्या माध्यमातून केले आहे.