नविन कौठा येथील गैरव्यवहार प्रकरणी जिल्हापरिषद समोर अॅड.गायकवाडांचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस -NNL

प्रशासन झोपेत 


उस्माननगर|
शहरातील नविन कौठा भागातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी वर्गात दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी अनेकदा करूनही प्रशासनाने या प्रकरणी कसलीच कारवाई केली नसल्याने महात्मा फुले समता परिषदेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अॅड.संघरत्न गायकवाड यांनी २९  डिसेंबर पासून जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण करीत आहेत. 


परंतु या उपोषणाचा पाच दिवस उलटून गेल्यानंतरही जिल्हा परिषदेचे प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन कसलीच दखल घेत नसल्याने या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर साक्षंकता निर्माण झाली आहे. दरम्यान हिवाळ्याच्या दिवसात उपोषनार्थीला थंड सोसावी लागत असली तरी प्रशासनाला याची झळ पोहचत नाही हे मात्र विशेष. 


शहरातील नवीन कवठा भागात असलेल्या जिल्हा परिषदे शाळेमध्ये सन 2020 व 21 सन 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते सातवी वर्गासाठी बोगस प्रवेशित विद्यार्थी शालेय गणवेश वाटप आणि प्रतिनियुक्तीवर आलेले व गेलेल्या शिक्षक यांना बोगस अपंग शिक्षक इत्यादी प्रकरणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून हा गैरव्यवहार निष्पन्न झाला असूनही याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून त्या भ्रष्टाचारी शिक्षकांना पाठीशी घातले जात आहेत हा याबद्दलची तक्रार महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट संघरत्न गायकवाड यांनी अनेकदा निवेदने देऊनही त्या तक्रारीची दखल प्रशासन घेत नाही.

त्यामुळे या संबंधित फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी केली असून याबाबत त्यांनी दिनांक 29 नोव्हेंबर पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे उपोषणास पाच दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन काहीच कार्यवाही करीत नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर सांशकता निर्माण होत आहे उपोषणकर्ते गायकवाड एन थंडीच्या दिवसात उपोषणास बसले असूनही या थंडीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी