नांदेड। देशभरात अनेक हिंदू तरुण तरुणींची काही जिहादी विचारसरणीच्या लोकांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याच गोष्टीचा निषेध नोंदविण्यासाठी हिंदू आक्रोश मोर्चा निमित्त सकल हिंदू समाजाची बैठक पार पडली.
नांदेड शहरातील स्वप्नील नागेश्वर, दिल्ली येथील श्रद्धा वालकर व लखनऊ येथील निधी गुप्ता यांची जिहादी मानसिकतेतून काही धर्मांधांनी निर्मम हत्या केली. देशभरात ठिकठिकाणी या प्रकारचा निषेध नोंदविण्यात येत असून नांदेड शहरात २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी जिल्हाभरातील सर्व हिंदू समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या बैठकीत ठिकठिकाणी प्रचार प्रसार करण्यासाठी कॉर्नर बैठका घेणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणे व इतर प्रचार यंत्रणांचा वापर सर्व हिंदू समाजाने करावे असे आवाहन बैठकीत अनेकांनी केले, यावेळी शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना,राजकीय पक्ष, विविध समाजाच्या संघटना आदी उपस्थित होते.