बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा -NNL

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांची मागणी


नांदेड।
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा  प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी जिल्हा उपनिबंधक श्री. मुकेश बारहाते यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा पणनमंत्री  एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे.

पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,कृषी उत्पन्न बाजार समिती संबंधित महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 च्या कलम 13 च्या दुरुस्ती करून बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्याच्या निर्णय आपल्या सरकारने घेतल्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करतो. आमच्या दृष्टीने ह्या निर्णयामध्ये व्यापकता आणण्यासाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणे गरजेचे आहे.

सन 2017 मध्ये आपल्याच सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत असताना यांनी या कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. बाजार समिती कायद्यातील सुधारणेनुसार बाजार समितीच्या बाजार क्षेत्रातील किमान दहा गुंठे जमीन ज्यांच्याकडे आहे आणि पाच वर्षात किमान तीन वेळा शेतीमालाची विक्री संबंधीत केली असेल अशा शेतकऱ्यांना मतदानासाठी पात्र ठरवण्यात आले होते.

सन 2017 ते 2019 या काळात राज्यातील ज्या बाजार समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अभ्यासू शेतकरी तथा शेतकरी नेते निवडून आले आहेत. यामुळे शेतकरी वर्गाला याचा मोठा फायदा झालेला आहे पण महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की कायद्यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा.

 शेतकऱ्यांना बाजार समितीच्या फक्त निवडणूक लढवण्याचा अधिकार देऊन फार उपयोग होणार त्यासाठी मतदार सुध्दा शेतकरी पाहिजेत अन्यथा धनदांडगे शेतकरी म्हणून निवडून येतील आणि घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यावेळी रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम पा.वडजे आणि ऑटो इंडियन जिल्हाध्यक्ष राहुल ढगे उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी