लोहा| महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृति दिनानिमित्त लोहा येथील नामांकित डी. के. पाटील फार्मसी महाविद्यालयात व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील बहीशाल शिक्षण केंद्राचे प्रसिद्ध व्याख्याते तथा शिव फुले-शाहू-आंबेडकर विचाराचे अभ्यासक रमेश पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.संदीप सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शालिनी ढवळे, प्रा.सौरभ आरळे, प्रा.संदीप आंबोरे, प्रा. सुदाम मुळे, प्रा. रत्नमाला येईवाड आदींची उपस्थिती होती. प्रमुख व्याख्याते रमेश पवार यांनी आपल्या व्याख्यानात यशवंतराव चव्हाणांचे जीवन चरित्रं सांगून ते उत्कृष्ठ संसदपटू, लोकनेता, कार्यक्षम मंत्री,वक्ते, लेखक व पुरोगामी विचाराचे कसे होते हे अनेक उदाहरणे देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या विचार धारेबद्दल व देशाच्या विकासाप्रती असलेली त्यांची आंतरिक तळमळ,कार्य सांगून यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री होते.त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी कशाप्रकारे केली.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास सांगून त्यातून बोध घेण्याचा उपदेश केला.या कार्यक्रमात कु.आचल पाकमोडे व वैभव शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण यांचा जीवन प्रवास आपल्या शब्दात मांडला. या कार्यक्रमप्रसंगी डी.फार्मसी व बी.फार्मसीचे विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बी.फार्मसीची विद्यार्थिनी कु. शुभांगी लामदाडे व कु.प्रतीक्षा सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.दीक्षा जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.