‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत नोंदणीकृत पदवीधर गटामधून वैद्य उमेदवारांची नावे जाहीर --NNL


नांदेड।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ चे कलम २८ (२) (t)नुसार नोंदणीकृत पदवीधरांच्या गटामधून अधिसभेवर निवडून द्यावयाच्यादहा प्रतिनिधीसाठी एकूण ६६ अर्ज प्राप्त झाले होते. अर्ज छाननी नंतर आणि अर्ज मागे घेतल्यानंतर आता एकूण ४१ उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी वैद्य ठरलेले आहेत. ठरवून दिलेल्या मतदान केंद्रावर दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८ ते ०५ वा. दरम्यान मतदान होणार आहे. दि.१६ नोव्हेंबररोजी मतदान मोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे. 

नोंदणीकृत पदवीधर गटातून नांदेड, परभणी,हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून जवळपास ११००० हजार मतदान होणार आहे. खुला गटामधून निवडणूक लढविण्यासाठी एकूण ३१अर्ज आले होते. त्यापैकी अर्ज छाननीनंतर आणि अर्ज मागे घेतल्यानंतर आता एकूण २२ पदवीधर उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी वैद्य ठरले आहेत.त्यामध्ये संतोष चौधरी, नारायण चौधरी, सुरज दामरे, हर्षवर्धन दवणे, श्रीकृष्णा दिव्ये, रोहिदास दुधाटे, किरण फुगारे, साहेब गजभारे, केदार जाधव, अरुणकुमार लेमाडे, महेश मगर, विनोद माने, याशोनिल मोगले, मोहम्मद सनाउल्ला खान, तुषार पतंगे, विक्रम पतंगे, युवराज पाटील, कमलाकर पवार, विठ्ठल सोळंके, राजु सोनसळे, किशोर सूर्यवंशी, दत्ता येवले इत्यादी उमेदवारांचा समावेश आहे. 


अनुसूचित जाती गटामधून एकूण १० अर्ज आलेले होते.अर्ज छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर आता  उमेदवार निवडणूक लढविण्यास वैद्य ठरले आहेत. त्यामध्ये अजय गायकवाड, नितीन गायकवाड आणि केशव जाधव उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती मधून एकूण  अर्ज आले होते. छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर आता  उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी वैद्य ठरले आहेत.त्यामध्ये आकाश रेजीतवाड आणि निकिता सिडाम यांचा समावेश आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती या गटातून एकूण  अर्ज आले होते. अर्ज छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर  उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी वैद्य ठरले आहेत. त्यामध्ये गजानन आसोलेकर, सायबू बेले, आनंद घुगे, आकाश रवंदळे आणि सिद्धेश्वर तिडके यांचा समावेश आहे. इतर मागासवर्ग गटातून एकूण  अर्ज आले होते. छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर आता  उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी वैद्य ठरले आहेत. त्यामध्ये सुनिल जाधव, शांतीलिंग काळे, हनमंत कंधारकर, मेघनाथ खडके आणि रामअप्पा तोडकर यांचा समावेश आहे. महिला गटामधून एकूण  अर्ज आले होते. अर्ज छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर आता एकूण  उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी वैद्य ठरले आहेत. त्यामध्ये निराली कलगापुरे, ममता पाटील, शितल सोनटक्के आणि शोभा वड्डेवार यांचा समावेश आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी