गोंडपीपरी नगरीत २० नोव्हेंबरला रंगणार काव्यमैफिल ; राज्यातील दिग्गज कवींची उपस्थिती आकर्षक ठरणार -NNL

कविसंमेलनाचे अध्यक्ष धनंजय साळवे तर उदघाटक सुधाकर अडबाले

अतिदुर्गम भागात विदर्भस्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन


चंद्रपूर|
जीवन गौरव मासिक प्रणित जीवन गौरव साहित्य परिवार (म रा) व शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपीपरी सारख्या अतिशय दुर्गम भागात प्रथमच विदर्भस्तरीय मराठी काव्यसंमेलनाचे आयोजन दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोज रविवारला मा.उद्धव नारनवरे साहित्य मंच, धनोजे कुणबी समाज सभागृह,गोंडपीपरी येथे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कविसंमेलनाचे उदघाटक मा.सुधाकर अडबाले,सरकार्यवाह विदर्भ माध्य.शिक्षक संघ व कविसंमेलनाध्यक्ष धनंजय साळवे गटविकास अधिकारी,गडचिरोली विशेष अतिथी श्रीकृष्ण अर्जुनकर मु.का.अ.गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था गडचिरोली, चेतनसिंह गौर नगरसेवक,राजेश ठाकूर सामाजिक कार्यकर्ते चामोर्शी,चेतन ठाकरे प्रवचनकार,गझलकार रज्जाक शेख,ग्रामीण कवी आनंदा साळवे अहमदनगर, लोककवी विजय ढाले, 'दाखल खारीज'कार नरेशकुमार बोरीकर,सौ.रेखाताई कारेकर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका,स्वागताध्यक्ष प्रा.संतोष बांदूरकर जनता कनिष्ठ महा.गोंडपीपरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.यात ज्येष्ठ साहित्यिक उद्धव नारनवरे यांना साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच साहित्य लेखन गौरव पुरस्कार, पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या विदर्भस्तरीय कविसंमेलन तीन सत्रात पार पडणार असून पहिल्या सत्रात निमंत्रित कवींची व नंतर सहभागी कवींची काव्यमैफिल रंगणार आहे.

सर्व निमंत्रित व सहभागी कवी/कवयित्री यांना सन्मानचिन्ह,पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सदर संमेलनाचे सूत्रसंचालन अर्चना जिडकुंठावार,वंदना डगवार हे करणार आहे.या विदर्भस्तरीय मराठी कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी गणेश कुंभारे,दुशांत निमकर यांच्या मार्गदर्शनात प्रा.भारत झाडे,उमेन्द्र बिसेन,अर्चना धोटे,संभाशिव गावंडे,वृषाली जोशी,तानाजी अल्लीवार यांच्या संयोजनात होणार आहे.

तसेच सदर कविसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जीवन गौरव साहित्य परिवाराचे डॉ.हितेंद्र धोटे,विकास सुखधाने,विलास गजापुरे,विलास टिकले इत्यादी पदाधिकारी व शब्दांकूर फाऊंडेशनचे राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख, राकेश शेंडे,सुशांत मुनगंटीवार,उज्वल त्रिनगरीवार, देवानंद रामगिरकर, रेखा गायकवाड,राहुल पिंपळशेंडे, विनोद पोगुलवार,सुचिता जिरकुंठावार, गणेश पिंपळशेंडे, अक्षय उराडे,विनोद देवगडे,बळीराज निकोडे, नितीन चापले, नितेश चुनारकर, मुकेश पिंपळशेंडे, सचिन दळवी,नंदिनी पिंपळकर,अरुण कुत्तरमारे, शीतल अकोजवार, अश्रका कुमरे, अमृता पोटदुखे,रामेश्वर पातसे,दीपा राखावार,ऍड.रुपेश सूर,सुनील सातपुते,झुंगा कोरडे,सुदर्शन भोगेकर इत्यादी पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी