वणी येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न -NNL


नांदेड|
अनंत श्री विभूषित जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळा वणी जिल्हा यवतमाळ येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा वणी शहरातील एच.बी.लॉन, लोकमान्य टिळक महाविद्यालय एल .टी. कॉलेजच्या मागे, आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमात पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे,पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे, जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे, पीठ जनगणना योजना प्रमुख टेंभेकर , जिल्हा पालकत्व अशोक गोंदाने, जिल्हाध्यक्ष सचिन वानखडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्याची सुरुवात भव्य अशा शोभायात्रेने सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम शंकर भाऊ घोगरे यजमानपद यांच्या घरून सिद्ध पादुकांचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. रथामध्ये जगद्गुरुश्रींची प्रतिमा व जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका यासह ही मिरवणुक एस. बी .लॉन या ठिकाणी पोहोचली. भव्य अशा शोभायात्रेमध्ये अनेक प्रकारचे देखावे तयार करण्यात आली होती. 


त्यामध्ये शिवाजी महाराज ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,महादेव पार्वती, भारतमाता,बंजारा नृत्य, घोडे, भजनी मंडळ, विना, बॅंड पथक,लेझीम पथक कलशधारी महिला, निशानदारी पुरुष यांचा समावेश होता. या शोभायात्रेचे शुभागमन वाजत गाजत संत पिठावर झाले. सर्वप्रथम जगद्गुरुश्रींची सामुदायिक आरती संपन्न झाली. या कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, रंगनाथ स्वामी अर्बन बँकेचे संचालक संजय खाडे, माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे , हिंगोली जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, पीठ समितीचे सर्व योजना प्रमुख यांची उपस्थिती लाभली होती.

मान्यवरांच्या हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत दुर्बल घटकातील गरजवंतांना ११शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक गुरुपूजन करण्यात आले. कार्यक्रमात ज.न.म .प्रवचनकार शोभाताई बाबर यांचे अतिशय सुंदर असे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले. त्यांनी आपल्या प्रवचनातून जीवनात गुरु का करावा आपल्या जीवनामध्ये गुरुचे महत्व किती अनन्यसाधारण आहे हे सविस्तरपणे उपस्थित भक्तगणांना समजावून सांगितले. यावेळी जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त  भक्तगण यांनी उपासक दीक्षा घेतली . यावेळी उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू संग्राम सेनेचे पश्चिम विदर्भ पिठाचे लेफ्टनंट जनरल नागेश पांचाळ,  जिल्हा समिती पश्चिम यवतमाळचे पदाधिकारी, पूर्व यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्षा दुर्गाताई मेघरे, जिल्हा कर्नल भारती ताई धामणकर ,बिन प्रमुख शुभम बावणे, सचिव प्रभाकर लाकडे ,युवा प्रमुख प्रणय काळे, शिबिर प्रमुख स्नेहल भोयर ,प्रसिद्धी प्रमुख सरिता राऊत,संजीवनी प्रमुख दीपक मोरे , सह कर्नल विजय मोरे, वनी तालुकाध्यक्ष शंकर घोगरे, महिला तालुकाध्यक्षा ममता धोटे  नागेश आतमंगल, संजय भिसे यांच्यासह जिल्हा समिती ,तालुका समिती , संतसंग, आरती समिती, हिंदू संग्राम सैनिक ,युवा सेना ,महिला सेना , सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी