रुग्ण व रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार एकाची प्रकृती चिंताजनक सातजण गंभीर जखमी ..!
अर्धापूर, नीळकंठ मदने। डोगरकडाकडून नांदेड येणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने चालकांचा ताबा सुटला रुग्णवाहिका रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येत असल्याचा टिप्परवर जाऊन आढळली रुग्णवाहिका आणि टिप्परची समोरासमोर धडक झाल्याने रुग्णवाहिकेचा चालक व रुग्ण जागीच ठार झाला असून रुग्णवाहिकेतील एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे .
येथून ८ कि मी अंतरावर असलेल्या हिवरा येथील किशन गोविंदे वय - ६५ यांना हिवरा पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली होती .जखमींवर उपचारासाठी डोगरकडा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले .मात्र त्यांची प्रकृती बिघडली असल्याने तेथील डॉक्टरनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेने पाठवून दिले .परंतु तीन किमी अंतर पार केल्यावर काळाने घाला घातला.
रुग्णवाहिकेच्या समोरून येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम .एच - ४० सी .डी - ५५५९ या टिप्परने जोरदार धडक मारली धडक येवठा भीषण होता की रुग्णवाहिकेचा समोरील भाग व इजन तुटून पडले .या अपघात रुग्णवाहिकेचा चालक बळीराम वाघमारे वय - ३२ आणि रुग्ण किशन गोविंदे वय - ६५ हे जागीच ठार झाले आणि सोबत असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे . जखमीमध्ये सातजण असल्याने माहिती मिळाली आहे