नांदेड/लातूर। दिनांक १६ ते २१ नोव्हेंबर २०२२ दरम्यान गडचिरोली येथे संपन्न झालेल्या ६६व्या महाराष्ट्रा स्टेट बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशिप २०२२ - २३ या स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.
सदरील राज्यस्पर्धेत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातील संघानी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नागपूर व अकोला संघास दोन सरळ सेट मध्ये एकतर्फी हरवून लातूर जिल्हा संघाने स्पर्धेत आपल्या खेळाची छाप सोडली होती . स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात गतवर्षीच्या विजेत्या वर्धा जिल्हा संघास तीन सेट मध्ये २ - १ ने हरवून राज्यस्तरीय स्पर्धेच्या विजेतेपदावर आपल्या दावेदारीचा इशाराच दिला...
विजयी घोडदौड कायम ठेवत राज्यस्तरीय स्पर्धेच्या क्वाटर फायनल मध्ये मुंबई संघाचा व सेमी फायनल मध्ये ठाणे संघास २ - ० व २ - १ ने हरवून फायनल मध्ये प्रवेश केला... स्पर्धेच्या फायनल मॕच मध्ये पुणे महानगर संघ हा वरचढ होत असलेला जानवत असताना लातूर जिल्ह्याचा बॕक शुटर अकबर पठाण , महाराष्ट्राचा बेस्ट प्लेअर म्हणून नामांकित असलेला नईम शेख यांनी आपल्या उत्कृष्ट शुटींग व प्लेसिंग ने तसेच लातूर संघाचे अनुभवी अंतरराष्ट्रीय खेळाडू पोलीस उप निरीक्षक असद शेख यांच्या गेम चेंजींग खेळाने लातूर जिल्हा संघाने पुणे महानगर संघाचा सरळ दोन सेट मध्ये ३९ - ३८ व ३५ - २२ ने विजय संपादन करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला...
लातूर जिल्ह्याच्या विजयात अदनान शेख,फैजान, तानाजी कदम, अभिजीत अण्णा यांची फ्रंट पोजीशन वरून दमदार नेट चेकिंग तर बॕक पोजीशन वरून अर्शद शेख, विकास जायभाये यांच्या फ्लोटिंग व डिफेंस हे विजयात महत्वाचे योगदान ठरले...लातूर जिल्हा संघास अय्युब जहागीरदार सर, रुषिकेश खंडुसर,डॉ.बालाजी सोगेवाड,आमेर शेख सर हे प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून लाभले ...लातूर जिल्हा मुलींच्या संघात - मनिषा सुर्यवंशी (कर्णधार), प्रणीता सुर्यवंशी, रोहिणी सुर्यवंशी , रागीणी यादव, शिवाणी फड, संध्याराणी येळीकर, दिपाली , संजीवणी , शिल्पा हे होते.
मुलांच्या संघात - अकबर पठाण (कर्णधार), तानाजी कदम, अदनान शेख, नईम शेख, विकास जायभाये, असद शेख, बी.एल. अभिजीत सर, अर्शद शेख, फैजान , ह्रूषीकेश गोटमुखले,हे होते...लातूर जिल्हा संघास गडचिरोली येथील आमदार मा. देवराव होळी, राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री पी.के.पटेल,सचिव अतुल इंगळे,कार्याध्यक्ष डि.एस गोसावी , गडचिरोली जिलूहा सचिव व राज्य सहसचिव ह्रुषिकेष पापडकर , श्री राजाभाऊ खंगार, व ईतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले...
लातूर जिल्हा संघाने गेल्या १४ वर्षांपासून शालेय विद्यापिठीय, असोसिएशन अश्या विविध स्पर्धांत उत्कृष्ट कामगीरी करून महाराष्ट् व देश पातळीवरील अनेक स्पर्धांत नेत्रदिपक कामगिरी करीत आपल्या कौशल्याने ठसा उमटवला आहे . मुले खेळाडूंमध्ये अकबर पठाण, चेतन मुंडे, अदनान शेख, तानाजी कदम, माधव सगरे, नईम शेख, संगमेश्वर लाटे, माधव सोनटक्के, आशू शेख, विकास जायभाये,फैजान शेख, मिरान शेख, निहाल पठाण, अर्शद शेख, वैभव कदम, प्रशांत सुरनर, माधव भिसे, सचीन भगत, सागर किरण, यश जाधव, यांनी तर मुलींमध्ये मनिषा सुर्यवंशी , उज्वला राठोड, पृथ्वी यादव, विद्या अंभोरे, पुजा राठोड,कल्पना पौळ, निता बानाटे,कोमल पौळ, आशा जाधव, प्रणीता ठवरे, अनु पाटील,स्वाती औसेकर, मनिषा माने, अश्विनी राठोड, स्वाती मुंडे, गंगा केंद्रे , प्रणीता सुर्यवंशी , रोहिणी सुर्यवंशी , कांचन उमाटवाडे, या खेळाडूंनी नेत्रदिपक कामरीने महाराष्ट्रात विजय प्राप्त करीत देशपातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन केलेले आहे...
लातूर जिल्ह्याचे भुमीपुत्र व सध्या नांदेड जिल्ह्यात पोलीस दलामध्ये एक निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे असद शेख यांनी या खेळात अनेक जिल्हा ,राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत विजय मिळवित देशाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक प्राप्त करीत मानाचा स्टार अॉफ इंडिया हा पुरस्कार ही मिळविला असून त्यांच्या मार्गदर्शनात या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते...
राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजय संपादन करून जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या सर्व खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संगमेश्वर निला, किलबील नॕशनल स्कुल चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा भोसले, मा. तबरेज सय्यद , मुख्याद्यापक संतोष पाटील, शफी शेख, प्रमोद पाटील व इतर अधिकारी पदाधिकारी यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ...