नांदेड/आदिलाबाद| कार्तिक एकादशी यात्रे निमित्त आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर करिता पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे ने घेतला आहे. या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करतात. त्यांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर साठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्याचा तपशील खालील प्रमाणे आहे:
अनु क्र. | गाडी संख्या | कुठून-कुठे | प्रस्थान | आगमन |
1 | 07501 | आदिलाबाद ते पंढरपूर | 14.00 (03.11.2022) | 08.00 (04.11.2022) |
2 | 07502 | पंढरपूर ते नांदेड | 10.45 (04.11.2022) | 23.30 (04.11.2022) |
3 | 07503 | नांदेड ते पंढरपूर | 18.35 (07.11.2022) | 08.00 (08.11.2022) |
4 | 07504 | पंढरपूर ते आदिलाबाद | 20.00 (08.11.2022) | 13.40 (09.11.2022) |
या गाडीत 10 सकेंड सीटिंग(2S), 08 स्लीपर क्लास, 01 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 02 एस.एल.आर असे 21 डब्बे असतील. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.