हिमायतनगर। महाराष्ट्र नाभिक महामंडळ समाज संघटनेकडून दिनांक 28 ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या पुण्यतिथी प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, तलाठी दत्तात्रय पुणेकर, गोदामपाल अवधूत बोडकेवाड , सेवानिवृत्त वनपाल संभाजी गायकवाड, पत्रकार परमेश्वर शिंदे, आदर्श शिक्षक दिलीप कोंडामंगल, गायकवाड सर, सचिन कळसे या सर्व मान्यवरांनी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका उपाध्यक्ष पप्पू सोळंके, गणेश वाघांबरे, युवा तालुका अध्यक्ष राज सूरजवाड,रमेश लिंगमपल्ले, सुभाष राचाटकर,साईनाथ चादनकर,चंद्रकांत कळसे,मारोतराव घुंगरे, बाबुराव सोळके,गोपाळ घुंगरे,अवधूत गायकवाड ,सुनील त्रिमलदार,शेखर गंधम, अंकुश शिंदे, बालाजी लिंगमपल्ले,पापा जुनापल्ले,समाधान घुंगरे,विश्वंभर जुनापल्ले, सुनील वाघमारे, गणेश आहेरकर ,सुनील शिंदे, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले,श्रीकांत घुंगरे,अनिल सूर्यवंशी,परमेश्वर सुरजवाड, सचिन कळसे, गजानन सुरजवाड, अभिजित कळसे,विशाल शिंदे,सह आदी नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
नागेश शिंदे यांचा सन्मान
मागील काळात कोरोना महामारीत सर्व नाभिक समाज बांधवांना संघटित करून समाजामधीलच गरीब गरजू नागरिकांना अन्नधान्याच्या मोफत रशन किट वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून तो यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल पत्रकार नागेश शिंदे यांचा समाज बांधवांनी सन्मान करण्यात आला.