स्वर्गीय शामाप्रसाद मुखर्जी यांना हिमायतनगर येथे अभिवादन - NNL


हिमायतनगर|
भारतीय राजकारणातील कोहिनूर हिरा, भारतीय जनसंघाचे संस्थापक, थोर समाजसेवक स्व. डॉ.श्यामाप्रसादजी मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त हिमायतनगर येथील भाजप कार्यालयात अभिवादन करण्यात आले.


श्यामाप्रसाद मुखर्जी (बंगाली) (जन्म: ६ जुलै १९०१; मृत्यू: २३ जून १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष आपण केले. त्यानंतर त्यांनी जे सेवेसाठी स्वतःला समर्पित केले असे महान व्यक्ती स्वर्गीय डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांच्यावर बंदी घातलेली असताना ते जेथे शेख अब्दुल्लाची राजवट होती. त्यांना काश्मीरमध्ये नेले त्यांना पकडून तुरुंगात टाकले. तेथेच ते मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली नाही. 


मृत्यूचे कारण अज्ञातच राहिले अशा महान थोर व्यक्तींना आज भारतीय जनता पार्टी हिमायतनगरच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून यांच्या जीवन चरित्रावर उजाळा देण्यात आला. त्यानंतर विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष आशिष सकवान, स्वप्नील गरडे, युवा मोर्चाचे राम सूर्यवंशी, बालाजी आलेवाड, गोसलवाड काका, परमेश्वर सूर्यवंशी, विशाल अनगुलवार, प्रमोद भुसारे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी