नायगाव। दिनांक 30 ऑगस्ट 2022 मौजे बरबडा, ता.नायगाव च्या सभेत साहित्य रत्न ,कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त विचार व्यक्त करतांना प्रा.सुर्यकार यांनी मौजे बडबडा नगरीमध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाली.
यावेळी साहित्यरत्न सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना अण्णाभाऊ साठे यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे नव्हे तर सामाजिक परिवर्तनामध्ये ज्या-ज्या चळवळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणल्या हा इतिहास नवतरुणानी वाचायला हवा आणि बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र शिका,संघटित व्हा, संघर्ष करा! मात्र मातंग समाज हा अजूनही अंधश्रद्धेत व्यसनाधीनतेत, कर्मकांडात आणि कोणाच्यातरी गुलामी मध्ये जीवन जगतोय हे बाजूला सारून नव्या उमेदीने पुढे यावं अन्यायग्रस्त मातंग समाजाला बंडाची भाषा संघर्षाची भाषा अण्णाभाऊ आपल्या साहित्यामधून तुम्हा आम्हाला दिल.
बाबासाहेबांनी तर संविधानिक हक्क आणि अधिकार घटनेच्या माध्यमातून आमच्या जीवनाच सोनं केलं ह्याला विसरता येणार नाही जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही असे बाबासाहेब म्हणायचे आणि मातंग बांधवांनी नवतरुणाने हा इतिहास पुन्हा जर वाचन केल तर मातंगाचा पूर्वापार इतिहास आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद पासून ते अण्णाभाऊ पर्यंत खरोखर वाचला असेल किंबहुना वाचला ही नसेल तर ते वाचायला शिकले पाहिजे आणि जी महामानवाने दिलेली मूल्य, विचार त्याचा अंगीकार करून समतेचे वारकरी बनायला पाहिजे असे प्रतिपादक रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्राध्यापक इरवंत सूर्यकारांनी केलं.
याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष सामाजिक व राजकीय नेतृत्व बरबडा नगरीचे माजी सरपंच बाळासाहेब धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजी मद्वेवाड, विश्वनाथ बडुरे ,या गावचे सरपंच माधवराव कोलगाने, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच नागोराव आंबटवार, प्रदीप वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल श्री सोनकांबळे, श्री कंधारे साहेब,आनंदा सूर्यतळ,पत्रकार गंगाधर धवळे, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,माझी सैनिक, पत्रकार व जयंती मंडळाचे संयोजक सर्व पदाधिकारी व मातंग आणि बहुजन बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती