नांदेड। नानक साई फाऊंडेशन ची घुमान यात्रा आजनानक साई फाऊंडेशन ची घुमान यात्रा आज दि 2 नोव्हेंबर रोजी पंजाबला रवाना होणार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अमृतसर स्पेशल एक्सप्रेस ने पंजाबला रवाना होणारआहे. संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांच्या 752 व्या जन्म शताब्दी निमित्त 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2022 दरम्यान 8 वी नांदेड ते अमृतसर "घुमान यात्रा" आयोजित करण्यात आली आहे.
घुमान यात्रा एक सामाजिक आध्यत्मिक चळवळ असून संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे या सोबतच पंजाब आणि महाराष्ट्रात बंधू भाव जागृत करून सांस्कृतिक देवाण घेवाण करणे हा या चळवळीचा मुख्य हेतू आहे.. पंजाब व महाराष्ट्र राज्यात बंधू भाव निर्माण करणे तसेच विचाराचे अदान प्रदान करण्यात हि चळवळ यशस्वी ठरली आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.. महाराष्ट्र व इतर प्रांतातील भक्त जण मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी 'तीर्थक्षेत्र घुमान' - 'सुवर्ण मंदिर' अमृतसर - शक्ती पीठ 'माता नैना देवी' - शक्तीपीठ माता ज्वाला देवी (हिमाचल प्रदेश) - 'आनंदपूर साहिब' (तख्त) - आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य 'भाकरा नांगल' धरण - पंजाबच्या संस्कृतीचा अंखो देखा इतिहास असलेले 'विरास्ते 'खालसा मुजियम' - सुल्तानपूर लोधी- गोविंदवाल साहिब -परजिया कलान-'कार्तिकी स्वामी' - वाघा 'अटारी' बॉर्डर - 'जालियनवाला' बाग - बस्सी पठाणा - फतेगड साहिब - पानिपत - कुरुक्षेत्र - दिल्ली असे भ्रमण आणि दर्शन घडवते..
ता. 2 नोव्हेंबर रोजी यात्रा 12421 स्पेशल अमृतसर एक्सप्रेस ने नांदेड येथून निघणार असून हिंगोली,अकोला मार्गे पंजाब कडे मार्गस्थ होणार आहे, 300 भाविक भक्त यात्रेत सहभागी आहेत. संत नामदेव महाराज घुमान यात्रेचे नांदेड रेल्वे स्टेशन हुन 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रस्थान होणार आहे, यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणीत करावे असे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे,.