पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक -NNL


नांदेड|
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्याबाबत शासनाच्या सूचना प्राप्त आहेत. ज्‍यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्‍यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. 

त्‍यानुषंगाने ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्‍यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in  या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान अँपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल किंवा  ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे प्रति लाभार्थी 15 रुपये दराने ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी