नांदेड, अनिल मादसवार| वाढत्या महागाईच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या उपस्थितीत युवकचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्या नेतृत्वाखाली दि. 1 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बहुत हुई महंगाई की मार, चलो हटाए मोदी सरकार... अशा विविध घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी राज्यभर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने नांदेड येथेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महागाईच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांनी जनता भरते जीएसटी गद्दार जातात गुवहाटी, महागाईने दुखते डोके गद्दारांना 50 खोके अशा विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी महागाईच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, गणेश तादलापूरकर, युनूस खान, नईम भाई, शेख खदीर, मोहम्मद सरफराज अहेमद, अब्दुल सत्तार, माधव पाटील चिंचाळे, उत्तरचे अध्यक्ष निखील नाईक, लखनसिंघ लांगरी, शहराध्यक्षा सिंधुताई देशमुख, उपाध्यक्ष कमलबाई लांडगे, प्रेमजितकौर कोल्हापूरे, हसीना बेगम, मोहम्मदी पटेल, सईदा बेगम, अनिकेत भंडारे, सुमेध सरपाते, आतिक भाई, खदीर भाई, जफार पठाण, सोहेल खान, पंकज कांबळे, जिलानी पटेल, परवेज पठाण, इमरान जवळेकर, मो. मुस्ताक, शेख रफीक, इमरान खान, आतिक बिल्डर, गुलाम मोबीन, सादीक खान, शेख मतीन, रऊफ पटेल, अब्दुल रजाक, जफार खान, अब्दल मतीन, जय्यत कादरी, मोहम्मद वसीम, मोहम्मद इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद अबरार, गोविंद यादव, दिलीपराव टाकळीकर, किशन क्षीरसागर, काका टोके, प्रभाकर भालेराव, शेख इमरान, शेख जब्बार, शेख फिरदोस, रवी भोरगे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. सणा-सुदीचे दिवस असताना सुद्धा गणेशोत्सवातही नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आगामी दसरा, दिवाळी सणामध्ये महागाई कमी करण्यासंदर्भात सरकारची कोणतीही ठोस भुमिका दिसत नाही. केंद्र आणि राज्य शासन हे केवळ विरोधी पक्षाचे सरकार पाडण्यात व्यस्त आहे. सरकारने महागाई कमी करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी व्यक्त केले.
मोदी सरकारने 2014 मध्ये दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे देशात महागाईचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असताना ईडी व सीआयडी भिती लाऊन भाजप सरकारने आघाडी सरकार कुटनितीने पाडले. दुसरीकडे मात्र भाजप नेत्यांवर आरोप करूनही कोणतीही कारवाई होत नाही. भाजपमध्ये जाताच सगळ्या आरोपातून मुक्त होतात. सगळ्या आघाड्यावर केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे निपुल शर्मा, राजासिंग यांच्या माध्यमातून देशात जातीयदंगे घडविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोप करत 2024 मध्ये भाजपचा देशातून सफाया होईल असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांनी व्यक्त केले.