हिमायतनगर,कल्याण पाटील। तालुक्यातील..कृषी विभाग प्रायमार्क कापुस कार्यक्रम महाराष्ट्र तसेच स्वाश्रयी महिला सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 28 नोव्हेंबर, 2022 रोजी घारापुर, येथील तालुक्यातील ढगे फार्म येथे महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रम मा.कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील शास्त्रज्ञ डॉ देशमुख सर, रणवीर सर उपविभागीय कृषी अधिकारी साहेब, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव सर यांच्या उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान बहुसंख्येने शेतकरी, महिला व ग्रामीण युवती सहभागी झाले होते. स्वच्छ मोकळे वातावरण, महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता ग्रामीण गावांमध्ये ग्राम विकासाच्या बरोबरीने कृषिपूरक उपक्रमांना सुरवात महिला शेतकऱ्यांनी. ग्रामस्थांची जीवनशैली उंचावून त्यांना स्वयंपूर्ण करण्याचे काम सुरू आहे. जैवविविधतेबरोबरच सेंद्रिय शेती आणि ग्रामस्थांना रोजगाराभिमुख करण्यासाठी संस्थेच्या वतीने निरंतर प्रयत्न सुरु केले आहे .
महिला या आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आणि घराची अर्थीक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे. महिलांना सेंद्रिय शेती कडे वळविण्यासाठी दशपर्णी, निंबोळी पेंड निम अर्क कसे करावे या बद्दल माहिती देण्यात आली.. आरोग्य विभागाच्या वतीने डॉ जाधव मॅडम यांनी महिला आरोग्यावर माहिती सांगण्यात आली महिलावर होणारे रोग कसे दूर करावेत यावर मार्गदर्शन केले आहे महिलांना रक्त वाढण्यासाठी माहिती देण्यात आली रक्त वाढीसाठी शेंगदाणे लाडू राजगिरा लाडू हे खाण्यासाठी सुद्धा सांगितले आहे..
कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री सुक्ष्म योजनेची माहिती देण्यात आली महिला हि उद्योजक झाली पाहिजे यासाठी मार्गदर्शन कृषी अधिकारी दिलीप जाधव सर यांनी केले आहे..कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ देशमुख सर यांनी महिला हि उद्योजक झाली तर घराचे अर्थीक परिस्थिती सुधारते , महिला जर शेती करत असेल तर त्या शेतीमध्ये लक्ष्मी नांदते आणि घराची अर्थीक परिस्थिती सुधारते..
रणवीर सर यांनी कृषी विभागाच्या योजना बदल माहिती दिली आणि त्या योजना शेतकऱ्या पर्यंत पोहोचाव्या आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे सांगितले..तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदानंद ढगे सर, शाम ढगे, डॉ ढगे सर , कृषी सहाय्यक वानखेडे साहेब, कृषी पर्यवेक्षक काळे साहेब, नंदनवार साहेब कृषी सहाय्यक ढगे मॅडम तसेच प्रायमार्क संस्थेचे कलुरकर साहेब यांचे सर्वांचे सहकाऱ्यांनी महिला शेतकरी कार्यक्रम संपन्न झाला आहे....