नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखा संकुलातील संशोधक विद्यार्थीनी पल्लवी प्रभाकर कावळे-रावणगांवकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. ही पदवी प्रदान केली आहे.
प्रा.डॉ.वाणी लातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अ क्रिटीकल स्टडी ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स इन नांदेड डिस्ट्रीक्ट या विषयावर विद्यापीठास शोध प्रबंध सादर केला होता. त्यांचे वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र संकुलातील अधिष्ठाता प्रा.डॉ.सौ.देशपांडे, प्रा.डॉ.वाणी लातूरकर, प्रा.डॉ.डी.एम. खंदारे, प्रा.डॉ.बी.एस. मुधोळकर, प्रा.डॉ. सोनिया रंधावा व संकुलातील इतर प्राध्यापक वर्गाने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.