लोहा| बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या लोहा तालुका प्रमुखपदी युवा नेतेव मिलिंद पाटील पवार तर शहर प्रमुख युवराज वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. उपनेते आनंदराव जाधव व पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
राज्यात मागील तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात मोठ्या घडामोडी झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाशी नैसर्गिक युती झाली व राज्यात शिवसेना - भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना खा. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे लोहा -कंधार विधानसभा संघटक पदाचा मिलिंद पाटील पवार यांनी राजीनामा दिला होता.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोहा तालुकाप्रमुख पदी मिलिंद पाटील पवार, यांची तर लोहा शहर प्रमुख पदी युवराज वाघमारे, यांची नियुक्ती करण्यात आली. लोहा तालुका संघटकपदी प्रभाकर राऊत देऊळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदरील नियुक्तीचे पत्र बाशि (बाळासाहेबांची शिवसेना ) पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.