नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भारत जोडो पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL


नविन नांदेड।
खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रवेश केल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी  सकाळी ८ वाजता जवाहरनगर तुप्पा येथे खासदार राहुल गांधी व सहभागी मान्यवरांच्ये स्वागत करण्यात आले यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी व शुभेच्छा फलक मुळे व मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहभागाने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

भारत जोडो अभियान अंतर्गत १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ही पदयात्रा दाखल  झाली यावेळी राहुल गांधी यांच्ये व सहभागी असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष नानासाहेब पटोले ,जय रमेश व आमदार अमरनाथ राजूरकर, जया चव्हाण,गोविंदराव कवळे, पदाधिकारी व विविध राज्यांतुन सहभागी झालेल्या पदाधिकारी यांच्ये स्वागत आ‌. मोहनराव हंबर्डे, व दक्षिण विधानसभा मतदारसंघ मधील पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी केले. नांदेड हैद्राबाद हा मुख्य मार्गावर वाहतूक पुर्णपणे बंद केल्याने रस्त्याचा दुतर्फा मोठे मोठे शुभेच्छा फलक , काँग्रेस पक्षाचे ध्वज,व मध्यभागी शुभेच्छा फलक यांनी सुमारे २५ किलोमीटर रस्ता भरभरून गेला होता तर रस्त्याचा दुतर्फा मार्गावर महिला युवक नागरिक यांच्या सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उभे टाकले होते.

जिल्हा परिषद सदस्य, मनोहर पाटील शिंदे,गंगाप्रसाद काकडे , माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद गुडीले, श्रीनिवास मोरे,युवा नेते राहुल हंबर्डे पं,स.ऊपसभापती प्रतिनिधी अब्दुल फईम प.स.सदस्य, गंगाधर नरवाडे यांच्या सह धनेगाव ग्रामपंचायत संरपच पिंटू पाटील शिंदे, कांकाडी माजी ऊपसंरपच सुदीन बागल, तुप्पा संरपच प्रतिनिधी ज्ञानेशवर यन्नावार,शिवकांत कदम, चिमणाजी पाटील कदम,शेख चांद पाशा,बबन कदम, दता पाटील कदम, बळीरामपुर संरपच अमोल गोडबोले,  बाभुळगाव संरपच पुंडलिक मस्के,भायेगाव ऊपसंरपच बालाजी पाटील कोल्हे,व सिडको परिसरातील काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी श्रीनिवास जाधव,युवा नेते उदय देशमुख, माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड,प्रा.अशोक मोरे, डॉ.करुणा जमदाडे, यांच्या सह वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे,भि.ना.गायकवाड, किशन रावणगावकर,दलीत मित्र नारायण कोंलबीकर,माधव अंबटवार,  शहर उपाध्यक्ष सतीश बसवदे,महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कविता चव्हाण, सुमनबाई पवार, सुनिता चव्हाण, परिसरातील अनेक गावांतील संरपच ऊपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य, व काँग्रेस आय नांदेड दक्षिण विधान मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागोजागी ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या वतीने घोषणा देत  स्वागत करण्यात आले तर पदयात्रा समोरील भागात पोतराज व सहभागी झालेल्या  महिला,तर चंदासिग चौक येथे पंजाबी नृत्य व आग्रभागी  बाड पथक,हे लक्ष वेधून घेत होते, अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे ध्वज उंच घेऊन मोठ्या प्रमाणात घोषणा देत युवक सहभागी झाले तर अंगावर घोषणा असलेले टि शर्ट घातलेल्या युवती सहभागी झाल्या होत्या.

औधोगिक वसाहतीतील सिप्टा कारखाना येथे तिनं तास विश्रांती घेतल्या नंतर दुपारी तीन चा सुमारास  नांदेड येथील नवा मोढा येथील सभेसाठी खासदार राहुल गांधी व सोबत असलेले पदाधिकारी वाहनाने देगलुर नाका कडे रवाना झाले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जवळपास कांकाडी ते चंदासिग चौक , धनेगाव,वाजेगाव ,देगलुर नाका व नांदेड शहरात दुतर्फा रोडवर व मध्यभागी भारत जोडो यात्रेचे अभिनंदन करणारे फलक, काँग्रेस पक्षाचे ध्वज,कमानी उभारण्यात आल्या आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने तुप्पा पाटी नजीक पाच एकर मैदानावर पदयात्रा मध्ये सहभागी  असणाऱ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी