नांदेड। रक्तदान चळवळ वृद्धिंगत व्हावी या शुद्ध हेतूने 'एकदा रक्तदान आईसाठी' हा उपक्रम रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील महावीर चौक येथील पुंडलिकवाडी भागात राबविण्यात येणार आहे. ज्यांना ज्यांना स्वतःच्या आईसाठी रुग्णालयात असताना रक्ताची पिशवी आणावी लागली अशांनी तसेच लोकांच्या आईला रक्त मिळावे यासाठी हा रक्तदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
नांदेड येथील दांडगे कुटुंबीयांनी स्वर्गीय शैलजा नृसिंहराव दांडगे यांच्या तेरवीनिमित्त येत्या १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दांडगे कुटुंबीयातील सदस्य रक्तदान करून श्रद्धांजली अर्पित करणार आहेत .
स्वर्गीय पत्रकार नृसिंह दांडगे यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तदान चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून अनेक शहरात शेकडो रक्तदान शिबिरे आयोजित करून गरजूंना रक्त पुरविण्याचे कार्य केलेले होते .या कामी त्यांच्या पत्नी स्व. शैलजा दांडगे यांनीही अशा प्रकारच्या उपक्रमांना मोलाची साथ दिलेली होती . स्व .शैलजा दांडगे यांना खरी श्रद्धांजली अर्पित करण्याच्या उद्देशाने त्यांचे जेष्ठ चिरंजीव अनिरुद्ध दांडगे (अध्यक्ष ब्लड डोनेशन कमिटी इंडियन रेडक्रॉस सोसायटी नांदेड ) व सौ. दीपा अनिरुद्ध दांडगे,कनिष्ठ चिरंजीव परीक्षीत व सौ भावना परीक्षीत दांडगे.तसेच मुलगी सौ प्राची व जावई नरेश धोंडीबा खमितकर आदींसह नातेवाईक व मित्रमंडळी रक्तदान करणार आहेत. या अभिनव उपक्रमाचे इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक केले .
ज्यांनी ज्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान आई गमावली अशांनी स्वतःच्या आईसाठी एकदा रक्तदान करावे , असे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे व रक्तदानात सहभाग घ्यावा, असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्याध्यक्ष माजी महापौर अजयसिंह बिसेन, उपाध्यक्ष डॉ.किरण चिद्रावार , उपाध्यक्ष डॉ .डी. बी . देशमुख, सचिव डॉ दीपक अग्रवाल, कोषाध्यक्ष डॉ भास्कर जन्नावार ,डॉ अशोक कलंत्री आदींनी एका पत्रकाद्वारे केले आहे .