कलबंर साखर कारखान्याच्या मालमतेचा लिलाव, मात्र नुकसानभरपाई देण्यास तहसीलदार यांच्या कडून टाळाटाळ -NNL

दिव्यांग विठ्ठल कतरे यांचा आमरण उपोषणाचा ईशारा  


उस्माननगर, माणिक भिसे।
येथून जवळच असलेल्या कलंबर ता.लोहा येथील साखर कारखाना चालू असताना पांगरा ता.कंधार येथील कामगार विठ्ठल कतरे हे कामाला होते.त्यावेळेस काम करीत असताना दोन्ही पाय मशीन मध्ये अडकून कापले गेल्यामुळे ते कायमचे लंगडे लुळे ( दिव्यांग )झाले .कतरे यांनी न्यायालयात जावून दाद मागितली दरम्यान न्यायालयांच्या आदेशाला  तहसीलदार महोदय केराची टोपली दाखवून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याने कतरे कुंटूबावर उपासमार होत  असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना निवेदन देवून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ डिसेंबर रोजी  आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

लोहा तालुक्यातील कलंबर चालू असतांना येथे कार्यरत कर्मचारी विठ्ठल कोंडीबा कतरे यांचे काम करीत असताना दोन्ही पाय मशीन मध्ये अडकून कापले जाऊन दोन्ही पाय निकामी झाले यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली नुकसानभरपाई द्यावी म्हणून पीडित कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाकडे दाद मागितली परंतु, कारखान्यांनी दखल घेतली नसल्याने पीडित कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली होती.

 यावरून न्यायालयाने  उपविभागीय अधिकारी कंधार व तहसीलदार लोहा यांना आदेश काढून कारखान्याच्या मालमत्ते चा लिलाव करून त्या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून पीडित दिव्यांग कतरे या लाभार्थ्यांला नुकसानभरपाई द्यावी असा आदेश दिला होता मात्र लिलाव होऊन रक्कम मिळाल्या नंतर हीतहसीलदार यांच्या कडून कात्रे यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. तात्काळ नुकसानभरपाई मिळावी यासाठी दि.5 डिसेंबर रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिव्यांग पीडित कर्मचारी विठ्ठल कतरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.

कलंबर सहकारी साखर कारखाना येथे कार्यरत असलेले विठ्ठल कोंडीबा कतरे यांचे कारखान्यात काम करीत असताना  सन 1999  दोन्ही पाय मशीन मध्ये अडकून पूर्णतः कापले गेले त्यांचे दोन्ही पाय कायमचे निकामी झाले  नुकसानभरपाई मिळावी म्हणून पीडित कर्मचारी विठलं कतरे यांनी  1999 मध्येच न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2002 मध्ये  नुकसानभरपाई पोटी पीडित कतरे यांना एक लक्ष 61 हजार मूळ रक्कम व त्यावर 12 टक्के व्याज लावून नुकसानभरपाई द्यावी असा आदेश देत नुकसानभरपाई ची रक्कम ही कारखान्याची मालमत्ता विक्री करून त्यातून द्यावी असा आदेश कारखाना प्रशासन व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले  असे असताना ही आज वीस वर्षे पूर्ण होत आहेत परंतु तहसीलदार यांनी न्यायालयाचा आदेश केराच्या टोपलीत टाकला आहे. पीडित कर्मचारी कतरे यांनी वारंवार मागणी केली.

 यावरून तहसीलदार यांनी न्यायालयाच्या अधीन राहून 13 सप्टेंबर 2019 मध्ये करखानाच्या मालमतेची भंगार वाहन यांचा लिलाव केला यातून 2 लक्ष 75 हजार रुपय रक्कम तहसील कार्यालयात जमा झाली. तरी पण तहसीलदार यांनी नुकसान भरपाईची रक्कम दिली. नाही पुन्हा 5 अगस्ट 2019 मध्ये कारखान्याची जमीन गट क्रमांक 870 ही राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने शासनाने ही जमीन संपादित केली  संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा दोन कोटी 34 लक्ष 49 हजार 284 रुपये ऐवडा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात प्राप्त झाले. या रक्कमेतून पीडित कर्मचारी कतरे यांना नुकसानभरपाई देने बंधनकारक असताना अद्याप तहसीलदार यांनी पीडित दिव्यांग कर्मचारी कतरे विठ्ठल यांना नुकसानभरपाई दिली नाही.

न्यायालयाने 1 लक्ष 61 हजार रुपय मूळ रक्कम व त्यावर 12 टक्के व्याज आकारून 3 लक्ष 56 हजार 413 रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश देऊन ही तहसीलदार हे लिलाव व जमीन संपादित केलेलय मावेजा रक्कम जमा असताना ही नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करीत असून त्यांनी न्यायालयाचा आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. तात्काळ नुकसानभरपाई मिळावी म्हणून पीडित कतरे विठ्ठल यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी निवेदन सादर करून मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसानभरपाई मिळाली नाही तर मी आपल्या कार्यालयासमोर 5 डिसेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी