नांदेड। देशातील उर्दू पत्रकारितेच्या द्विशतकपूर्तीनिमित्त रविवार दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता उर्दू घर देगलूर नाका येथे 'उर्दू पत्रकारिता दिशा व प्रगती' या विषयावर परिसंवाद होणार आहे. इकरा मॅग्झीनचे संपादक अथर कलीम यांनी एका पत्रकात ही माहिती दिली.
नांदेड येथील उर्दू लेखक संघटना, इकरा मॅग्झीन, एन. एस. बी. कॉलेजचा उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात प्रेस कौन्सील ऑफ इंडियाचे सदस्य एम. जे. माजीद तसेच नजफ अली शौकत (अध्यक्ष, प्रेस मिडीया, हैद्राबाद), उर्दू घरचे व्यवस्थापक डॉ. सय्यद शुजात अली यांच्यासह देशातील प्रमुख उर्दू पत्रकार व लेखक उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालय स्तरावर घेतलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी केले जाणार आहे. नांदेड येथील उर्दू दैनिक नांदेड टाईम्सचे संपादक मुन्तजीबोद्दीन यांच्या पत्रकारितेच्या पंचविसाव्या वर्षानिमित्त त्यांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच राज्यस्तरीय उर्दू कवी संमेलन मुशायरा घेतले जाणार आहे