नांदेड। आठ नोव्हेंबर ला जेजुरी येथिल धनगर समाज जागृती परिषदेत कवी, लेखक समाज प्रबोधनकार गोविंदराम शूरनर लिखित " बहुजनांचे प्रबोधन " या पुस्तकाचे प्रकाशन मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथीले सर, प्रदेशाध्यक्ष राजीव हाके, इंजिनिअर शिवाजीराव शेंडगे, यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
आध्यक्षिय भाषणात बलभीम शेंडगे म्हणाले,गोविंदराम यांनी जिवनभर समाज परिवर्तन घडवण्यासाठी आयुष्य घालून पुराण व इतिहासातील सत्य शोधले आणि सत्य सांगण्याचे काम कवितेतून, लेखणीतून, आणि प्रबोधनातून समाजाला सांगीतले, ते नेहमी सांगत असतात प्रथम सत्यशोधन करा,मगच समाज प्रबोधन करा आणि समाज संघटन करा तरच आपले राष्ट्र संघटन मजबूत होईल. समाजात वाचन संस्कृती वाढेल , तेव्हांच तुमचं शोषण दुर होऊन मानसिक गुलामीतून बाहेर पडाल आणि स्वाभिमानाने जगाल असा संदेश समाजाला देत
देत असतात, ते समाजांनी स्विकारावे असे प्रतिपादन बलभीम माथीले सरानी केले. लेखक गोविंदराम यांनी म्हणाले हे सर्व कांहीं घडवून येत आहे त्यात समाजाचा व कार्यकत्यांचा सिंहांचा वाटा तसेच मौर्य क्रांती महासंघानी हा योग घडवून आणून मला सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार दिले त्यामुळे मी त्यांचे रूण व्यक्त करून सर्वांचे आभार मानतो.
या वेळी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रविण काकडे,बामसेफचे अध्यक्ष कमलाकांत काळे, चित्रपट निर्माते घनशाम येडे, राजेंद्र बरकडे, ओबीसीचे नेते तुकाराम माळी , मुबारक नदाफ, अमोल पांढरे,रासपाचे विक्रम ढोणे ,संतोष खोमणे, शंकर देशमुख, मदनेश्वर शूरनर, सुर्यकांत गुंडाळे, मौर्य क्रांती प्रतिष्ठानचे गोविंद गोरे, रामराव पिसाळ, तुडमेसर , प्रा.लक्ष्मण सरोदे, किशनराव टेकाळे, नागोराव बाराशे यांची प्रमुख उपस्थिती होती.