नविन नांदेड| रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लाईट नसल्याने वरच्या मजल्यावर झोपण्यास गेलेल्या निवासस्थानी असलेल्या गेटचे कुलुप तोंडुन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. आणि आलमारीतील पत्नी व सुन यांचे १८ तोळे दागदागिने किमंत पाच लाख पन्नास हजार व रोख रक्कम सहा हजार चोरून नेल्याची घटना दि १४ जुनं रोजी एक ते चार सुमारास घडली. सकाळी घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून घटनास्थळी श्वान पथक व फिंगरप्रिंट कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सिडको परिसरातील १३ जुनं रोजी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने मेघगर्जनेसह लाईट गेल्याने एनं,डि,४२ भागातील सेवानिवृत्त भुमी अभिलेख ऊप अधीक्षक के.ना.जेठेवाड हे आपल्या निवासस्थानी खालच्या घरातुन वराचा घरात झोपण्यासाठी गेले असता मध्यरात्री सुमारास गेटचे कुलुप तोंडुन आत प्रवेश करून आलमारीतील पत्नी व सुन यांचे दागदागिने व रोख रक्कम चोरून कपाटातील सामान अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत आढळून आले.
सकाळी पत्नी ने वरून खाली येताच गेट चे कुलूप तोडलेले व आलमारीतील समान विखुरलेल्या दिसल्या नंतर टाहो फोडालया नंतर परिवारातील सदस्य यांनी खाली धाव घेऊन तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार केली.ना.जेठेवाड यांनी दाखल केली. यात त्यांनी पत्नीचे दागिने पाटल्या , मंगळसूत्र, गंठण,तिनं अंगठ्या व सुनबाई यांच्या नेकलेस,लाकेट, चांदीची चैन ,चंफुल, सोन्याच्यी ठुसी, काड्या असा एकुण १८ तोळे अंदाजे किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये व सहा हजार रुपये नगदी ऐसा ऐवज लंपास केला.या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम ४५७,३८०, नुसार दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक शेख जावेद व कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली तर श्वान पथक मार्फत व फिंगरप्रिंट कर्मचारी यांच्या साहाय्याने चोरीचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला पंरतु मुसळधार पावसामुळे तो लागु शकला नाही.घटनासथळी उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे व प्रभारी पोलिस निरीक्षक हाणुमंत गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.
अंतर्गत वसाहातीत असलेल्या या निवासस्थानी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.जेटेवाड यांच्या अलीकडे असलेल्या निवासस्थानी घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला असता घरात काहीच आढळून आले नाही. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक शेख असद हे करीत आहेत.
