मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे -NNL

 सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डायलिसिस मशीन बंदच तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची सततची गैरहजेरी


मुखेड,रणजित जामखेडकर।
नांदेड शहरानंतर जिल्ह्यातील तालुका स्तरावर असलेले १०० खटाचे उपजिल्हा रुग्णालय अश्या मुखेड उपजिल्हा रूग्णालयाची शहरांमध्ये सुसज्ज इमारत आहे. येथे तज्ञ डॉक्टरांची, वैद्यकीय अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती आहेत. नियुक्त असलेले अधिकारी नांदेड , लातूर सारख्या ठिकाणी राहुन उंटावरून रुग्ण सेवा करत आहेत. तर काही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाच्या वेळेमध्ये नांदेड, लातूर,औरंगाबाद सारख्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात मध्ये प्रॅक्टिस करत आहेत.

यामुळे शासनाने लाखो रुपये पगार देऊन ठेवलेले अधिकारी रुग्णालयात हजर राहत नसल्याने मुखेड तालुक्यातील गोर -गरीब नागरिकांना शासनाच्या रुग्णसेवेचा लाभ भेटतच नाही. परिणामी गोर - गरीब रुग्णांना नांदेड सारख्या ठिकाणी जाऊन आपले उपचार करून घ्यावे लागतात उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहे. याकडे गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी , आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांनी लक्ष घालुन मुखेड तालुक्यातील रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करूण द्यावी अशी मागणी केली जात आहे. 

जिल्ह्यातील नांदेड नंतर एक नंबरचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या १०० खाटांच्या मुखेड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शासनाने लाखो रुपये खर्चून दिलेले सिटीस्कॅन मशीन, सोनोग्राफी मशीन, डायलिसिस चे मशीन, बंद आहेत यामुळे तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे उत्तरासाठी सल्ला दिला तो यामुळे रुग्णांची आर्थिक व मानसिक पूर्ण होत आहे याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुद्धा पुरवावी - @ नितीनदादा तलवारे, जिल्हाध्यक्ष मास सामाजिक संघटना

मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील

वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याची तक्रार मागील पाच वर्षापासून आहे याकडे प्रशासनाने कोणतेही लक्ष दिले लक्ष दिले नाही व लक्ष देण्यासाठी  तयार नसल्याची वस्तुस्थिती आहे उपजिल्हा रुग्णालयात अधिकाऱ्याची मनमानी चालू आहे वैद्यकीय अधिकारी मुख्यालय न राहता नांदेड लातूर सारख्या ठिकाणी राहून खाजगी प्रॅक्टिस करतात बनावट हजरी पट दाखवुन लाखो रुपयाचे पगार उचलून शासनाची फसवणूक करून मुखेड तालुक्यातील गोर - गरीब रुग्णांच्या आरोग्य धोक्यात टाकत आहेत. याकडे बाबींकडे वरिष्ठांचे कुणाचेही वचक नाही. या बाकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी लेखी निवेदन लातूर येथील आरोग्य उपसंचालक यांच्याकडे केली आहे. आरोग्य उपसंचालकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी -@ प्रभाकर कागदेवाड, सामाजिक कार्यकर्ते मुखेड

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी