येसगी येथील शेतकऱ्याची बिलोली शिवारात गळफास घेऊन आत्महत्या -NNL


बिलोली, गोविंद मुंडकर|
तालुक्यातील येसगी येथील सुनिल विरभद्र क्यादरकुंटे वय ३२ या तरूण शेतकऱ्याने दि.१२ नोव्हेंबर रोजी शहरातील कुंडलवाडी मार्गावरील राईस मिल लगत असलेल्या आब्याच्या शेतातील झाडाला स्वतःच्या शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.


बिलोली शहरापासून एक ते दिड किलोमीटर अंतरावर मराठवाडा राईस मिल आहे.या मिल लगतच बिलोली नगर परिषदेच्या एका माजी नगाराध्यक्षाचे आमराईचे शेत आहे.या शेतातच सुनिल क्यादरकुंटे याने शर्टाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आंब्याच्या झाडाला प्रेत लटकत असल्याची दिसताच काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. 


घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक रामदास केंद्रे,बिट जमादार चंद्रमणी सोनकांबळे,पोलिस नाईक एम.एस मुद्देमवार यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करत झाडाला लटकलेल्या अवस्थेत असलेले प्रेत झाडावरून काढले. शव विच्छेदनासाठी बिलोली येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिले.सदर शेतकऱ्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा व भाऊ आसा परिवार आहे.वृत्त लिहिपर्यंत बिलोली पोलिस स्थानकात घटनेची नोंद घेण्याची प्रक्रीया सुरू होती.सदर तरूणाने कोणत्या कारणाने आत्महत्या केली याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी