छोट्या सर्वेशचे स्वप्न राहुल गांधींनी साकारले...NNL


नांदेड|
भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना  राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला नाही व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले.शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला संगणक भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले.


पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातल्या प्रत्येक मुलाने  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. परंतु भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाखो मुले कोरोना काळात संगणक नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले.  भारत जोडो यात्रा अशा स्वप्नांना मुर्त रुप देण्याचे काम करत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी