नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये संपन्न झालेल्या १८ व्या ‘इंद्रधनुष्य २०२२’ या आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय युवक महोत्सवात सहभागी झाला होता.
दि. ५ ते ९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या युवक महोत्सवात विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कलावंतांनी एकूण २७ पैकी २३ कला प्रकारांमध्ये एकूण ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या युवक महोत्सवात अत्यंत दमदार आणि प्रभावी सादरीकरण करून ‘लोकसंगीत वाद्यवृंद’ (फोक आर्केस्ट्रा) या कलाप्रकारात सुवर्णपदक पटकावून विद्यापीठाचा संघ महाराष्ट्रात सर्वप्रथम आला आहे. यामध्ये समाधान राऊत, शांतेश्वर सरवदे, धम्मदीप सपकाळ, मुंजाजी शिंदे, ज्योतिबा बडे, मनोज झुंगा, सारंग भोळे, रामदास कुलकर्णी, शुभम गोंधळी, अंकुश डाखोरे, गजानन गोंधळी यांनी सहभाग घेतला होता. त्यांना डॉ. शिवराज शिंदे आणि डॉ. पांडुरंग पांचाळ यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले. वादविवाद स्पर्धेमध्ये कृणाल बेद्रे आणि साईनाथ महादवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला यासाठी त्यांना डॉ. संदीप काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
लोकनृत्य/आदिवासी नृत्य या कलाप्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. यामध्ये राम सावंत, अजय हंडरगुळे, अलोक वलकटे, पृथ्वीराज चव्हाण, पवन येरमे, कृष्णा उल्लेवाड, आकाश सोयाम, विवेक धुर्वे, प्रदीप तोडसाम, अरुण मडावी यांनी सहभाग घेतला होता. त्यांना श्री. संदेश हाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. समूहगीत भारतीय या कलाप्रकरात तृतीय पारितोषिक पटकाविले असून, यामध्ये निशा कांबळे, निवेदिता घोडेकर, कमलाक्षी कुलकर्णी, प्रियंका बनसोडे, अभिरुपा पैंजणे, गायत्री साखरे, धम्मदीप सपकाळ व समाधान राऊत यांनी सहभाग घेतला होता. त्यांना डॉ. शिवराज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. मनोज झुंगा, अभिषेक शिंदे आणि ज्योतिबा बडे यांनी नवलाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या स्किट (विडंबन) या कलाप्रकारात विद्यापीठाला तृतीय पारितोषिक मिळाले.
त्याचबरोबर ज्योतिबा बडे याने सादर केलेल्या मिमिक्री (नक्कल) या वैयक्तिक कलाप्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला राष्ट्रिय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दिलीप डोंबे यांचे मार्गदर्शन त्याला लाभले तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकांकिकेत कु. ऐश्वर्या डावरे, मनोज झुंगा, अभिषेक शिंदे आणि ज्योतिबा बडे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. तर सिध्दार्थ नागठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक्षा हळदे, शिवानी ढोरे, इरफान पठाण, संजय भराडे, संकेत गाडेकर या विद्यार्थ्यांनी ललित कला या प्रकारात चमकदार कामगिरी केली. १८ व्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवाच्या शोभायात्रेत स्थानिक लोकसंस्कृतीचे उच्च दर्जाचे सादरीकरण करून ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या संघाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकाविले.
कोव्हीड काळानंतर संपन्न झालेल्या या पहिल्याच इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवा महोत्सवात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील संघांनी एका पेक्षा एक सरस सादरीकरण केले. त्यामध्ये सांस्कृतिक समन्वयक डॉ. संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वारातीम’ विद्यापीठातील विद्यार्थी कलावंतांनी वेगवेगळ्या कला प्रकारात आपल्या प्रभावी सादरीकरणातू वेगळी ओळख निर्माण करून दिली. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. विजय पवार आणि प्रा. माधुरी पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. विभागाचे कर्मचारी संभा कांबळे व बालाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.
१८ व्या इंद्रधनुष्य युवा महोत्सवामध्ये यशस्वी कामगिरी केलेल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी कलावंतांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, प्र- वित्त लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदींनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.