अर्धापूर, नीळकंठ मदने| नांदेड - नागपूर महामार्गावर असलेल्या पार्डी (म)ता.अर्धापूर या गावाजवळ रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने रस्त्यावर गतिरोधकाची निर्मिती करून या ठिकाणी शाळा असल्याचे दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पार्डी(म) येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून तालुक्यासाठी व जिल्हाला जाण्यासाठी निमगाव ,देळूब ,कारवाडी ,भोगाव इत्यादी गावातील नागरिक पार्डी (म) येथे येतात तसेच गावातील नागरिक व विद्यार्थी यांचीही वर्दळ नेहमीच असते .याच रस्त्याच्या जवळच राजाबाई महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे .या शाळेत येणाऱ्या विद्यार्थी संख्या भरपूर असून जिल्हा प्राथमिक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय कमी असल्याने त्यांना रस्ता ओलांडून जावे लागते.
शाळा सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असते .मात्र या ठिकाणी शाळा व विद्यालय असल्याचे फलक लावण्यात आले नसून त्यामुळे वाहनचालक आपल्या वाहनाची गती कमी करीत नाहीत .त्यामुळे लहान मोठे अपघात होतच राहतात .रस्ता दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारानी शाळा असल्याचे फलक किंवा गतिरोधक उभारून होणारे अपघात टाळावे अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात येत आहे .
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे राजाबाई महाविद्यालयच्या भीतीजवळ रस्ता असल्याने शाळेचा मेंन द्वार बंद करण्यात आले असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यवी मार्ग म्हणून दुसरा द्वार सुरू केले आहे .परंतु शाळेमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून यावे लागते.