सिमरन दिवस जाप मध्ये हजारों भाविकांचा सहभाग; विश्व बंधुत्व व मानव कल्याणासाठी अरदास -NNL


नांदेड।
गुरुद्वारा तखत सचखंड हजूरसाहेब येथे मंगळवारी सायंकाळी सिमरन दिवस सामूहिक जाप कार्यक्रम श्रद्धाभावाने पार पडले. सिमरन दिवस निमित्त श्री गुरु ग्रंथसाहेबांचे पाठ करण्यात आले, तसेच विशेष कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.   

गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या मार्गदर्शनात 4.30 वाजता पंधरा मिनीटाचे सामूहिक मूलमंत्र जाप सुरु झाले. मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी यांनी मूलमंत्र जाप उच्चारण केले. या वेळी सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मीतग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, माजी मीत ग्रंथी ज्ञानी अवतारसिंघजी शीतल, संतबाबा  बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ परविंदरसिंघ पसरीचा, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, उपमहापौर सरजीतसिंघ गिल, माजी बोर्ड सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सामूहिक जाप नंतर विश्वशांति, बंधुत्व आणि मानव कल्याणासाठी अरदास करण्यात आली. अरदास उपरांत लंगर प्रसाद कार्यक्रम पार पडले. 


संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्यावतीने लंगरसेवा करण्यात आली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ परविंदरसिंघ पसरीचा यांनी आपल्या सन्देशात म्हंटले की, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी वर्ष 2007 मध्ये जागृती यात्रा प्रस्थानवेळी  पहिल्यांदा सामूहिक मूलमंत्र जाप अर्थातच सिमरन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे सिमरन दिवस एका परंपरेने सुरु झाले  आणि आज संपूर्ण विश्वात हा कार्यक्रम परिचित आहे. मला दुसऱ्यांदाही संधी लाभली आहे आणि माझ्यावतीने प्रामाणिकपणे सेवा सुरु आहे. येथील समाजाच्या शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांति घडवून आणायची आहे. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तखत सचखंड येथे पार पडलेल्या सामूहिक जाप मध्ये अनेक देशातील भाविकांनी टीवी आणि इंटरनेटच्या माध्यमातून सहभाग नोंदविला. गुरुद्वारा परिसरातही हजारोंच्या संख्येत सर्वधर्मीय भाविक उपस्थित होते.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी