नायगांव येथे २७ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटविकाराचे एंडोस्कोपी शिबीराचे आयोजन -NNL

ग्रामीण भागातील रुग्णानी या शिबीराचा लाभ घ्यावा..-डाँ.नितीन जोशी


नांदेड/नायगांव।
'गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन नांदेड'द्वारा संचलित भारत देशातील तिसरे आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिले 'फिरते एंडोस्कोपी रुग्णालय' या शिबीराचे आयोजन नायगांव नगरपंचायत दि. २७ नोव्हेंबर २०२२ सकाळी ८:०० ते दुपारी  ३:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पोटविकाराच्या रुग्णांनी यात तपासणी करूण घ्यावे से आव्हान डॉ. नितीन जोशी यानी केले आहे. तरुण वयात पचनसंस्थेच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमीत कमी करण्यासाठी सामाजिक जीवनमान वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सामान्य जनतेमध्ये पचनसंस्थेच्या कॅन्सरच्या गाठींचे (तोंड, अन्ननलिका, जठर किवा लहान आतड्याचा सुरवातीचा भाग) केवळ शेवटच्या टप्प्यातच पोहचणारे रुग्ण पाहून या आजारांच्या गाठींचे निदान प्राथमिक अवस्थेतच (पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या टप्यातच)एंडोस्कोपीद्वारे करून, खूप लवकर निदान व उपचार करण्यात येतील. खालील वयोगटात बसणाऱ्या आणि लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीच तपासणी याठिकाणी करण्यात येईल. वय ३० ते ६० वर्षे. इतर कोणतेही अतिगंभीर स्वरूपाचे आजार असू नयेत. तपासणीला येण्यापूर्वी खालील सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय ही तपासणी होणारच नाही .

१. रात्री १२ वाजेनंतर काहीही खाऊ नये. २. सकाळी ७ वाजेपर्यंत पाणी, नारळपाणी व विनदुधाचा चहा ( डीकॉशन) घेऊ शकता. ३. मधुमेह (शुगर) असणाऱ्या रुग्णांनी आपली सकाळची (गोळ्या किंवा इन्सुलीन) औषधे घेऊ नयेत, एन्डोस्कोपी झाल्यानंतर अर्ध्या तासाने नाशत्यासोबत घ्यावीत. ४. आपली रोजची इतर आजारांची (उच्च रक्तदाब, थायरॉइड, फिट्स इत्यादी) औषधे नेहमीच्या वेळेप्रमाणे घ्यावीत. ही सरकारी योजना नाही किंवा यासाठी कोणत्याही प्रकारची सरकारची मदत घेतली गेली नाही, आपल्याला खालील लक्षणे असतील तर ही तपासणी करा.

1) आपल्याला तंबाखू, गुटखा, मट्टेल, मावा, खर्रा, जर्दा, पान, नस, गांजा, दोडे, अफीम किंवा दारू यांचे कोणत्याही स्वरूपात व्यसन अनेक दिवसांपासून असणे. २. गिळताना घास अडकणे किंवा खूप हळूहळू गिळावे लागणे. ३. घास गिळताना छातीत दुखणे किंवा आग होणे. ४. अन्न किंवा पाणी गिळताना ठसका लागून नाक किंवा तोंडातून बाहेर येणे किंवा बोट घालून उलटी करण्यास भाग पडणे, ५.जेवणानंतर पोट दुखणे किंवा भयंकर मळमळ होऊन उलटी करावीशी वाटणे किंवा उलटी होणे. ६. झपाट्याने वजन कमी होणे, अन्नाचा घाण वास येणे. ७. जेवणानंतर पोट फुग्यात हवा भरल्याप्रमाणे फुगणे, ८. जेवणानंतर पोटात आग होणे जळजळ होणे. ९. रात्री-अपरात्री झोपेत पोट दुखणे किंवा पोट दुखल्यामुळे जाग येणे. १०. अचानक भूक कमी होणे आणि त्यासोबतच वजन कमी होणे किया अत्राची किळस निर्माण होणे. ११. डांबरासारखी काळी संडास होऊन किंवा रक्ताची उलटी होऊन हेमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असणे, १२. आपल्या घरात जवळच्या कोणत्याही नातेवाईकाला वयाच्या ४० वर्षांच्या आत पचनसंस्थेचा कॅन्सर झाल्याची माहिती असणे.

सदर योजना गॅलक्सी पचनसंस्था आणि यकृतविकार रुग्णालय, बोरबन, वजिराबाद, नांदेड द्वारा निर्मित आणि कार्यान्वित करण्यात आली आहे. मोठ्या शहरात जाण्यासाठी लागणारा वेळ, त्यामुळे वाया जाणारे कामाचे तास, सोबत असलेल्या नातेवाईकांचा वाया जाणारा वेळ, त्यांच्या कामाचे तास आणि डॉक्टरांची तासन तास वाट पाहत उपाशी तापाशी बसून वाया जाणारा वेळ मोठ्या शहरांत येणारा मोठा खर्च वाचविण्यासाठी शहरी भागातील वैद्यकीय सुविधा ग्रामीण, आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील भारतीय नागरिकांना त्यांच्याच गावात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन डॉ. नितीन जोशी, पचनसंस्थाविकार तज्ज्ञ, नांदेड यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.

पचनसंस्थेच्या ज्या रुग्णांना वरील लक्षणे दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस किंवा वारंवार दिसत असतील त्यांनी एंडोस्कोपीची तोंडाद्वारे केली जाणारी तपासणी करून घ्यावी आणि त्यात गंभीर स्वरूपाचे आजार निघाल्यास आपल्या सोयीच्या किंवा ओळखीच्या कोणत्याही मोठ्या रुग्णालयात जाऊन लवकर उपचार करून घ्यावेत.

सदर तपासणीसाठी उच्च दर्जाची एंडोस्कोपीची सुविधा असणाऱ्या रुग्णालयात आजच्या तारखेत साधारणपणे पाच हजार सहाशे पन्नास रुपये (रु. ५६५०/-) आणि रक्त तपासणीचे सोळाशे रुपये ( रु. १६०० /- ) इतका खर्च येतो. ही तपासणी आपल्या गावात फक्त रुपये अकराशेमध्ये (रु.११००/-) आणि रक्त तपासणी रु. चारशे फक्त (रु. ४००/-) मध्ये करण्यात येईल. एकूण रु. १५०० (पंधराशे) मात्र आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी