एसटी डेपो नांदेड आगाराचे वरिष्ठ लिपीक राजेशसिंह गहेरवार सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न -NNL


नांदेड|
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार (एसटी डेपो) येथील वरिष्ठ लिपीक राजेशसिंह विठ्ठलसिंह गहेरवार हे वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर ३३ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ सोमवार रोजी दुपारी ठिक २ वाजता एसटी डेपो नांदेड आगार कामगार कर्मचार्‍यांच्यावतीने त्यांचा सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हनमंतराव ठाकूर हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय यंत्र अभियंता (चालन) तथा विभाग नियंत्रक मंगेश कांबळे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी सुधीरभाऊ पटवारी, उपयंत्र अभियंता निलेश तागड, सामाजिक कार्यकर्ते बजरंगसिंह गौर, विश्‍वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकररावजी नांदेडकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक विठ्ठल इंगळे, सुधाकर घुमे, आकाश भिसे, विशाल निवडंगे, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कारमूर्ती राजेशसिंह गहेरवार पत्नी सौ. शोभा गहेरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम प्रशासनाच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार प्रवासी बॅग स्मृतीचिन्ह भेट देऊन विभाग नियंत्रक मंगेश कांबळे यांच्या हस्ते राजेश गहेरवार यांचा सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यावेळी वरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर यांनी मांडले.

यावेळी आजी- माजी कामगार, कर्मचारी सौ. शिल्पा ढवळे, लक्ष्मी पाटोदेकर, राजेश्री कल्याणकर, सविता निलेवाड, श्‍वेता तेलेवार, कल्पना मोरे, कलावती नरवाडे, अनिता एंगडे, कल्पना तारु, कांतीलाल दुर्गे, राजेश गट्टू, जय कांबळे, एम.डी. गौस, निर्दोस पवार, अमोल भालेराव, दिपक मुदीराज, दिनेशसिंह ठाकूर, दिलीपसिंह ठाकूर, बालाजी शिंदे, आतिश तोटावार, राजेंद्र निळेकर, चंद्रकांत कदम, ताजोद्दीन, मोरताटे, सुर्यकांत चापोले, सुमीत महाजन, शंकर बेलूरकर, केशव टोंगे, गुलाम रब्बानी, संतोष मोरे, संदीप देशमुख डी.एम. पाटील, गोविंद सोनटक्के, शेषेराव मोरे, कपील सोनसळे, दामेरा, बाबादास पाटोदेकर, ज्ञानोबा घोरबांड, हरी वरळे, संजय खेडकर इत्यादी कर्मचारी बंधु- भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी