बनसोडे परीवाराचा सामाजिक उपक्रम
नांदेड| वाढदिवस म्हटले की, अनाठायी खर्च मोठा गाजावाजा पैशाची धुळधाण करून मोठेपणाचा देखावा केला जातो परंतु सिडको भागातील बनसोडे परिवाराने आपली कन्या कु. आनिक्षा अनिल बनसोडे हिच्या दुसऱा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने करून दि.३१ आक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता नांदेड शहरातील जुना मोंढा येथील बालाजी मंदिर परिसरात मायेची उब म्हणून चादर वाटप करण्यात आल्या. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. कु. अनिक्षा अनिल बनसोडे , रमेश झगडे, अपुर्व बनसोडे , अँड. जयवंत गजभारे, सुधीर गजभारे , मनीष गजभारे, सुनीता बनसोडे, हार्दिक झगडे, रोहित पारडे समवेत आदी उपस्थित होते.