उमरखेड तालुक्यात पुन्हा वसंत बहरणार
नांदेड/हिंगोली। खासदार हेमंत पाटील यांनी पंधरा वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेला वसंत साखर कारखाना पोफाळी, लवकरच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या सेवेत सुरु होणार आहे. कारखान्यासाठी लागणाऱ्या विविध पदासाठीच्या मुलाखती नुकत्याच नांदेड येथील सहकारसूर्यच्या मुख्य ईमारतीत मोठ्या पार पडल्या. त्यामुळे उमरखेड तालुक्यात पुन्हा वसंत बहणार असल्याने शेतकरी, कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत साखर कारखाना मागील पाच वर्षापासून बंद अवस्थेत होता. कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज असल्याने बँकेने कारखान्यावर जप्ती आणली होती. दरम्यान कारखान्यावर अवसायक नेमण्यात आला. अशा विपरीत परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यासह आजूबाजूच्या ३० किलोमीटर परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांना इच्छा नसताना देखील मागील पाच वर्षापासून ऊसासारख्या नगदी पिकाऐवजी इतर पिके घ्यावी लागत होती.
कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत होते. शेतीवर असणारे परिसरातील लहान मोठे उद्योग बंद पडले. गावातील तरुण मुले उच्चशिक्षण घेऊन रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरासह इतर राज्यात कामासाठी स्थलांतरीत होत होते. त्यामुळे वसंत कारखाना पुन्हा कधी सुरु होणार हा सर्वांसमोर मोठा प्रश्नच होता. खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने पोफाळीचा वसंत साखर कारखाना सुरु होणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार, बैलगाडीवाले, ट्रॅक्टर चालक, खते, बी - बियाणे, लहान हॉटेल व्यवसायीक, दुकाने, दळणवळण सुविधा वाढुन सर्वसामान्य लोकांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
कारखान्यासाठी लागनारे मुख्य अभियंता, रसायन तंत्रज्ञ, पासून ते सुरक्षारक्षक आणि चालक अशा विविध पदासाठी मुलाखती वसंत शुगर इन्स्टिट्युट तज्ज्ञ प्रमोद देशमुख, अविनाश देशमुख, पायोनियर तहारे, कृषी अधिकारी कल्याणकर, वसंत शुगर कारखाण्याचे व्यवस्थापकीय संचालक कटियार, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखती संपन्न झाल्या. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह यवतमाळ, हिंगोली, नांदेड, किनवट, माहुर, हिमायतनगर व परिसरातील जनतेच्या आशा अपेक्षा उंचावल्या आहेत. या भागातील शेतकरी व शेतीसंबंधी उद्योग - व्यवसाय, कुशल व अर्थकुशल कामगारामध्ये उदासिनता होती.
वसंत हाताला काम मिळणार का असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. परंतू खासदार हेमंत पाटील यांनी वसंतच्या माध्यमातून यवतमाळच नव्हे तर हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आनंद पेरण्याचे स्वप्न दाखवले. इतकेच नव्हे, न्यायालयीन प्रक्रीयापूर्ण होताच इथल्या शेतकरी, कामगार, कष्टकरी, शिक्षित व अर्थशिक्षित तरुणाईच्या जीवनात पुन्हा वसंत फुलविण्यास सुरुवात देखील केली आहे. लवकरच हा कारखाना सुरु होणार असून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ भरण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखतीस हिंगोलीसह नांदेड, पुणे, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, नागपूर, पंजाब, हरियाणा सारख्या ठिकाणाहून ५०० पेक्षा अधिक तरुण तरुणींने विविध पदासाठी मुलाखती दिली. त्यामुळे पुन्हा त्याच जोमाने वसंत फुलणार हा जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. कारखाना परिसरासह आजूबाजूच्या 30 किलो मिटरपर्यंतच्या जवळपास एक लाख लोकांना देखील वसंत सुरु झाल्याचा फायदा होणार हे निश्चीत झाले आहे. नांदेड येथील सहकारसूर्यच्या मुख्यालयात सकाळी सुरु झालेल्या मुलाखती सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध विभागातील तज्ज्ञ अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरु होत्या. दरम्यान मुलाखती साठी आलेल्या प्रत्येकासाठी चहा - नाष्टा व शुद्ध थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.