जागते रहो करत तामसा पोलीसांची रात्रीची गस्त सुरू....NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

तामसा/हदगाव| घरफोडी, दरोडा हाणामाऱ्या खून यासारखा एखादा प्रसंग...त्यावेळी पोलीस कुठे काय करतात, रात्रीची गस्त राहिलीच नाही असे काही जण सहज बोलून जातात... हातात काठी घेऊन जागते रहो, जागते रहो ...असे ओरडत रात्रीचा खडा पहारा देणारा पोलीस अजून चित्रपटातच पाहायच का? अशी जनमानसात शंका येणे स्वाभाविक आहे. यास मात्र तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यात उतरून दाखविले आहे. श्री मुंजाजी दळवे सध्या स्वतः रस्त्यावर उतरून रात्रीची गस्त घालताना दिसत आहेत.

त्याला आपण तरी कसे अपवाद बनू शकतो पोलीस ठाण्यात दिवसभराचे काम, बंदोबस्तात ,गुन्ह्याचा तपास कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांवर रात्रीच्या गस्तीची जबाबदारी असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये थकलेल्या जीवांना रात्रीची निवांत झोप घेता यावी यासाठी रात्रभर पोलीस रस्त्यावर गस्त घालतात. अशीच गस्त घालत असणारे तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मुंजाजी दळवे हे स्वतः रस्त्यावर उतरून रात्रीची गस्त घालताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत तामसा पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. 

मागील काही महिन्यापूर्वी तामसा पोलीस हद्दीत अनेक प्रकारची दरोडे, चोऱ्याचे प्रकार घडलेले आहेत. पण सध्या जसा तामसा पोलीस स्टेशनचा पदभार श्री. मुंजाजी दळवे यांच्याकडे आला तेव्हापासून तामसा पोलीस हद्दीत अनुचित प्रकार चोऱ्या दरोडे लुटमार इत्यादी प्रकरणावर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे साहेब यांची करडी नजर असून  स्वतः एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा दळवे साहेब हे रात्रीची गस्त घालताना दिसत आहेत हे मात्र विशेष ..

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post