डिजिटल मीडिया परिषदेच्याही सर्व पत्रकारांनी अधिवेशनात सहभागी व्हावे - अनिल वाघमारे -NNL


पुणे।
मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांचा मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे होत आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,प्रत्येक दोन वर्षांत मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होत असते.या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील तमाम पत्रकारांसाठी एक खास मेजवानी असते.गत राष्ट्रीय अधिवेशन नांदेड नगरीत पार पडले.

मध्यांन्तरी कोरोना या महाभयंकर संकटामुळे हे अधिवेशन घेता आले नाही.आता मात्र सर्व वातावरण स्वच्छ सुंदर आणि निरोगी दायी असल्याने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे हे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. मराठी पत्रकार परिषदेची महाराष्ट्र राज्य स्तरीय टीम या कामी लागली असुन पुणे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे अधिवेशन आगळे वेगळे करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. हे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन येत्या १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील शंकरराव गावडे भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जेष्ठ पत्रकार यांचे अनमोल विचार ऐकावयास मिळणार आहेत.त्याच बरोबर मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मिडिया परिषद हे नवीन विंग सुरू केले असून महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्या - जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेची टिम तयार केली आहे. डिजिटल मिडिया परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांना या अधिवेशनात एक अनौखा अनुभव घेता येणार आहे.राज्य भरातील विविध न्यूज चॅनलचे ऍन्कर आपला प्रवास आणि अनुभव त्याचबरोबर यु ट्यूब चॅनल, पोर्टल चालकांना एक वेगळं प्रशिक्षण घेता येणार आहे.

याच बरोबर या राष्ट्रीय अधिवेशनात  अनेक प्रसिद्ध मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे या अधिवेशनात पत्रकारांचे प्रश्न व त्यावरील पुढील दिशा व काहीं ठराव निश्चिती करणार आहेत. आपणही आपला सहभाग या अधिवेशनात घ्यावा. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिह्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषद जिल्हा व सर्व तालुका पदाधिकारी सभासदांनी अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी