नांदेड। खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात पदार्पण केलेल्या भारत जोडो यात्रेत अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या संविधान बचाव रॅलीत् जिल्हा समन्वयक मंगेश कदम यांनी ढोल ताश्याच्या गजरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह निळे झेंडे व घोषणबाजीने खा.राहुल गांधी यांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य अनुसचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी खा.राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथे येताच अनुसूचित जाती विभागाच्या वस्तीने आपल्या असंख्य पदाधीकारी व कार्यकर्त्यासह रोडलगात ढोल ताश्याच्या गजरात संविधान बचाव घोषणाबाजी व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेसह निळे झेंडे हातात घेऊन असंख्य महिला व पुरुष हे रोड लगत उभे असताना खा.राहुल गांधी यांचे लक्ष वेधले राहूल गांधी बाबासाहेब याच्या प्रतिमेला हात दाखवून अभिवादन केले. या प्रसंगी
राज्य उपाध्यक्ष राजकुमार एंगडे, प्रदेश सरचिटणीस प्रफुल सावंत , डॉ. गंगाधर सोनकांबळे, महेंद्र गायकवाड ,शशिकांत हत्तीआंबीरे, अमोल धाडवे,युवराज आवटे, प्रशांत कांबळे, दिलीप दुगाने,गौतम भुसावळे, सचिन वाघमारे,विकी गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील अनुसूचित जाती विभागाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर,राज मेहरोल वाल्मिकी,यांनी यावेळी सदिच्छा भेट दिली.