नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अध्यापक गटातून सिनेटवर जाण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली होती. दि. २९ नोव्हेंबर रोजी स. १०:०० वा. मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. दि. २८नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत या मतमोजणीचा निकाल हाती आलेला आहे.
अधिसभेसाठी खुल्या गटामधून डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. अशोक मोटे, डॉ. विजय भोपळे, डॉ. ए.टी. शिंदे, डॉ. विष्णू पवार यांची निवड घोषित करण्यात आलेली आहे. महिला प्रवर्गातून डॉ. करुणा देशमुख निवडून आलेले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गामधून डॉ. डी.ए. पाईकराव विजयी झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गामधून डॉ. अशोक टिपसे विजयी झाले आहेत. इतर मागास प्रवर्गातून डॉ. महेश बेम्बडे, विमुक्त व भटक्या जमाती प्रवर्गामधून डॉ.संतराम मुंढे हे विजयी झाले आहेत.
विद्यापीठ अध्यापक सलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधील अध्यापकांच्या गटामधून विद्याशाखेनिहाय विद्यापरिषदेवर मतमोजणीनंतर ६ सदस्यांची निवड घोषित करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील खुल्या गटामधून डॉ. अंबादास कदम आणि इतर मागासप्रवर्गामधून डॉ. ए.पी. शिंदे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. मानव व विज्ञान विद्याशाखेतील खुल्या गटामधून डॉ. डी. एन. मोरे आणि अनुसूचित जाती प्रवर्गामधून डॉ. नारायण कांबळे यांचा विजय झाला आहे. वाणिज्य विद्याशाखेतील खुल्या गटामधून डॉ. एच. एस. पतंगे यांचा विजय झालेला आहे. आंतर विद्याशाखेतील महिला प्रवर्गातून डॉ. सुरेखा भोसले यांचा विजय झाला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांनी सर्व निवडणुका शांततेत पार पडल्यामुळे सर्व मतदान प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या सर्व निवडणुका अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियोजनबद्ध घेतल्याबद्दल सर्व उमेदवारांनी विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन करून आभार मानले.
‘स्वारातीम’ विद्यापीठ निवडणूक; विद्यापीठ अध्यापक सिनेट निकाल जाहीर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अध्यापकामधून अधिसभेवर ३प्रतिनिधी निवडून द्यायचे होते. त्यामध्ये डॉ. बि. एस. सुरवसे, डॉ. शालिनी कदम, डॉ. दिलीपकुमार बोईनवाड यांचा मतमोजणीनंतर विजय झाला आहे.
दि. २९नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेले आहेत. यामध्ये विद्यापीठ अध्यापक गटातून अधिसभेवर खुल्या गटामधून १, महिला गटामधून १, अनुसूचित जमाती प्रवर्गातून १ असे ३ उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यामध्ये खुला गटामधून डॉ. बि. एस. सुरवसे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. महिला गटामधून डॉ. शालिनी कदम यांचा विजय झाला आहे. तर अनुसूचित जमाती गटामधून लातूर येथील दिलीपकुमार बोईनवाड यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक अधिकारी डॉ.सर्जेराव शिंदे यांनी सर्व निवडणुका शांततेत पार पडल्यामुळे सर्व मतदान प्रतिनिधी, अधिकारी,कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या सर्व निवडणुका अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियोजनबद्ध घेतल्याबद्दल सर्व उमेदवारांनी विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन करून आभार मानले.