शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्र येथे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सतत रुग्ण सेवेत तल्लीन असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.यु.व्ही.पोघे यांची पदव्युत्तर शिक्षना साठी निवड झाल्याबद्दल दि.०६ नोव्हेंबर रविवार रोजी बालाजी आलेवार मित्र मंडळ शिवणी इस्लापुरच्या वतीने सत्कार करण्यात आले.
डॉ.पोघे व डॉ.कानिफनाथ मुंडे या दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांनी २०१९ ते २०२१ या दरम्यान कोरोना महामारीच्या दरम्यान प्रार्थमिक आरोग्य केंद्र शिवणी अंतर्गत येणाऱ्या परिसरातील वाडी तांड्यात घरोघरी जाऊन कोरोना विषयी जनजागृती व कोरोना संक्रमनापासून बचाव करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत मोठया प्रमाणात शिवणी परिसरातील जनतेला दिलासा दिल्या.तेंव्हापासून वैद्यकीय अधिकारी डॉ.यु.व्ही.पोगे,व वैद्यकीय अधिकारी डॉ.कानिफनाथ मुंडे या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यानी जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान मिळवले. वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भागात तीन वर्षे सतत सेवा दिल्यानंतर या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली.
या अनुषंगाने डॉ.यु.व्ही पोघे यांचे वैद्यकीय, सामाजिक सह इतर अनेक स्थरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत असून किनवट भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आले.या वेळी बालाजी आलेवार मित्र मंडळाचे मित्र परिवार सह मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश देशमुख हुडीकर,संग्राम बिरकुरे,रुपेश जयस्वाल,संतोष जाधव, हन्मंतु भुशिवाड,लाईनमन राहुल वाठोरे,पत्रकार प्रकाश कार्लेवाड,शेख जुनेद,आनंद पोतरे सह प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणीचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.या वेळी उपस्थितांनी डॉ. पोघे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तर वैद्यकीय अधिकारी डॉ.पोघे यांनी उपस्थितांचे आभार मानले.