नविन नांदेड। सिडको ढवळे चौक भागातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या अनेक पानटपरी व हातगाडे मनपा अतिक्रमण पथकाने ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस बंदोबस्ताचा साह्याने व सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोधदीन व कर्मचाऱ्यांच्या ऊपसिथीत हे अतिक्रमण १३ आक्टोबर रोजी काढण्यात आले आहे .
सिडको परिसरा लगत असलेल्या ढवळे चौका लगत असलेल्या दुतर्फा रस्ता लगत अनेक पान टपरी ,हातगाडे, यांच्या मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करणे बाबत मनपा अतिक्रमण पथकाने मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या परवानगी घेतल्या नंतर त्याचा आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीमचे वसिम तडवी,यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंगे,स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे राहुल सोनसळे, ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात, उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे, बि.टी.केद्रे व पोलीस अंमलदार यांनी कडेकोट बंदोबस्त मध्ये चोहीकडे असलेल्या अनेक पानटपरी ,हातगाडे व अतिक्रमण केलेले रोडवरील साहित्य क्रेन चा साह्याने व कर्मचारी यांच्या सहकार्याने काढण्यात आले आहे,हि कार्यवाही काल दुपारी पासून संध्याकाळ पर्यंत चालुच होती, अखेर हा परिसर आता अतिक्रमण मुक्त झाला आहे.