नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार मालमत्ता थकबाकीदार असलेल्या सिडको क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत दोन कार्यवाही केली असून सदर कार्यवाही सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली १४ आक्टोबर रोजी करण्यात आली आहे, या कार्यवाही मुळे थकीत मालमत्ता धारकांत खळबळ उडाली आहे.
आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त कर निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोद्दीन ,कर निरीक्षक सुधीर सिंह बैस, सुदास थोरात, वसुली लिपीक मारोती सांरग, मालु एनफळे, मदन कोल्हे, संदीप धोंडगे, दता पानपटे, रविंद्र पवळे, नरसिंग कुलकर्णी यांच्या पथकाने मालमत्ता ४०५१०००८८८ मालमत्ते वर ३लक्ष १३हजार८८५रू व मालमत्ता क्र.११/६/६०४ या मालमत्तेवर ८३हजार२१७ रु. कर थकीत असल्याने सदर मालमत्ता सील करण्यात आली.
मालमत्ता कर वसुलीसाठी यापुढेही अशा कारवाई करण्यात येतील तसेच महापालिकेच्या वतीने शास्ती माफी योजनेला मुदतवाढ दिली आहे. सुट योजना लागू केली आहे. मनपा हद्दीतील मालमत्ताधारकांनी आपला चालू व थकीत मालमत्ता कर भरणा करून वरील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सिडको क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ रईसोधदीन यांनी केले आहे.