नांदेड। स्वच्छ भारत नागरी आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नांदेड महापालिका अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात शहरात स्वच्छता केली जात आहे. याचाच भाग म्हणून तरोडा बुद्रुक येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटी विकास नगर येथे माझी सोसायटी माझा अभिमान या उपक्रमांतर्गत आज स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्याम दवणे, सचिव परमेश्वर दिपके, उपाध्यक्ष गंगाधर सोनाळे, सल्लागार मनोहर भास्करे, शामराव हटकर, प्रसाद कोयलवार, श्रीनाथ सूर्यवंशी, सुधीर येरनाळीकर, भीमराव लोहाळे, दीपक कांबळे, प्रतीक कावळे, सुमेध पाईकराव, शंकर ईरलोड, पार्थ कुऱ्हाडे, शुभम सूर्यवंशी, वेदांत कुऱ्हाडे, रुद्राक्ष राऊत, देवेश सावळे, भगवान सूर्यवंशी, मिलिंद व्यवहारे आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.
या उपक्रमाला सोसायटील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक जण झोकून सफाईचे काम करत होते, मंदिर परिसर, पंचशील ध्वज स्तंभ परिसर, पाण्याची टाकी परिसर साफ करण्यात आला. माझी सोसायटी माझा अभिमान या उपक्रमांतर्गत दर रविवारी एक तास या परिसरातील नागरिक विकास नगर मधील परिसराची श्रमदानातून स्वच्छता करणे एकल प्लास्टिक वापरावर बंदी आणने, घन कचरा व्यवस्थापनासह सांडपाणी व्यवस्थापनाचे काम श्रमदानातून केले जाणार आहे.