मा. युवा नेतृत्व नगरसेवक राहुल लोहबंदे यांच्या वत्तीने मिरवणुकीवर जल्लोषात पुष्पवृष्टी करण्यात आली
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ईद - ए मीलाद अर्थात ईस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर जन्मदिनानिमित्य भव्य जुलूस ए मोहम्मदी काढुन शांतीचा संदेश देवुन ईद उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील हजरत मस्तानशाह वली दर्गाह येथुन रविवार दि. ०९ आक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य जुलुस काढण्यात आला. याजुलुस मध्ये गरिब नवाज मस्जीद, रजा चौक मस्जीद, मदीना मस्जीद, नुरी मस्जीद येथील नागरिक, अबालवृध्द , तरुण शेकडों च्या संख्येनी सहभागी होते. बसस्थानक चौकात उपस्थित बांधवांना हाफिज अब्दूल गफार यांनी हजरत महंमद पैगंबर यांच्या जिवन चरित्रवर मार्गदर्शन केले.
तसचे जुलुस मध्ये मदिना येथिल गुंबद ए खजरा यांची प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. जुलूस शहरातील प्रमुख मार्गाहुन फिरुन उपरोक्त मस्जिद जवळ समापन करण्यात आले. ईद निमित्य शहरात विविध ठिकाणी खाऊ, मिठाई, पाणी वाटप करण्यात आले. युवा कार्यकत्यांनी सहभाग घेतला. ईद ए मीलाद निमित्य पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सह होमगार्ड दलाचे जवान, पोलिस कर्मचा-यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.
जुलूस ला यशस्वी समापन करण्यासाठी गरिब नवाज मस्जीदचे युसुफ शहा, रजा चौक मस्जीदचे सदर शेख अनवर टेलर, नुरी मस्जीद चे सदर शेख उस्मान, रफिक शेख, सह अयुब पठाण, फेरोज सौदागर, मियाँ कुरेशी, सय्यद सुभानी, शौकत होनवडजकर, रमजान सौदागर, पत्रकार रियाज शेख, पत्रकार बबलु मुल्ला, सय्यद एफ.एम., खाजा धुंदी, मुनवर शेख, अकबर मुंशी, वसीम मुल्ला , ईसाक सलगरकर, गुलाम रसूल, शे.मुस्तफा, जिलानी शहाँ, अस्लम सय्यद, एजाज बागवान, मुंन्ना पेंटर, आदींनी प्रयत्न केले.